वैद्यकीय, जीवनावश्यक, निर्यातदार उद्योगांनाच परवानगी : जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 07:27 PM2021-05-25T19:27:54+5:302021-05-25T19:31:45+5:30

CoronaVirus Kolhapur : जिल्ह्यात केवळ वैद्यकीय, जीवनावश्यक साहित्य, निर्यात करणाऱ्या उद्योगांनाच काही अटींवर परवानगी देण्यात येत आहे. उद्योगाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय तसेच कोरोना चाचणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिली.

Only medical, vital, exporting industries are allowed: Collector Daulat Desai | वैद्यकीय, जीवनावश्यक, निर्यातदार उद्योगांनाच परवानगी : जिल्हाधिकारी दौलत देसाई

वैद्यकीय, जीवनावश्यक, निर्यातदार उद्योगांनाच परवानगी : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Next
ठळक मुद्देवैद्यकीय, जीवनावश्यक, निर्यातदार उद्योगांनाच परवानगी : जिल्हाधिकारी दौलत देसाईकामगारांच्या राहण्याची सोय तसेच कोरोना चाचणी बंधनकारक

कोल्हापूर : जिल्ह्यात केवळ वैद्यकीय, जीवनावश्यक साहित्य, निर्यात करणाऱ्या उद्योगांनाच काही अटींवर परवानगी देण्यात येत आहे. उद्योगाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय तसेच कोरोना चाचणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग उच्चांकावर असून अन्य जिल्ह्यांमधील रुग्ण संख्या कमी होत असताना कोल्हापुरमध्ये मात्र रोजची पॉझीटिव्ह व मृत्यू दरदेखील जास्त आहे त्यामुळे जिल्ह्यात आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. आता पुन्हा राज्याच्या ब्रेक द चेनचे नियम लागू झाले असून सकाळी ७ ते ११ यावेळेत जीवनावश्यक वस्तू व सेवांना परवानगी देण्यात आली आहे. आठ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यातील तीनही औद्योगिक वसाहती व सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. आता या उद्योगांना नियम अटी लागू करुन परवानगी देण्यात आली आहे.

याअंतर्गत केवळ वैद्यकीय कारणासाठी लागणारी उत्पादने, जीवनावश्यक साहित्यांचे उत्पादन, निर्यातीचे उद्योग व बंद न करता येणारे सातत्यपूर्ण उद्योग सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय व सर्वांची ॲन्टीजेन आणि लक्षणे असल्यास आरटीपीसीआर करणे बंधनकारक केले आहे. उद्योगाच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी १३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
 

Web Title: Only medical, vital, exporting industries are allowed: Collector Daulat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.