पेट्रोल-डिझेल अत्यावश्यक सेवांसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:49+5:302021-07-24T04:15:49+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल-डिझेलची टंचाई भासू नये यासाठी ...

Only for petrol-diesel essential services | पेट्रोल-डिझेल अत्यावश्यक सेवांसाठीच

पेट्रोल-डिझेल अत्यावश्यक सेवांसाठीच

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल-डिझेलची टंचाई भासू नये यासाठी पूरपरिस्थिती ओसरेपर्यंत सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश दिले असून यापुढे इंधन अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच देण्यात येणार आहे.

पुरामुळे महामार्ग किंवा अंतर्गत रस्ते बंद झाल्यास जिल्ह्यातील सर्व कंपन्यांच्या सर्व पेट्रोल पंपावर मुख्य महामार्ग बंद झाल्यास किंवा अंतर्गत रस्ते बंद झाल्यास पेट्रोल, डिझेलची टंचाई होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पूरस्थिती ओसरेपर्यंत पोलीस, आरोग्य विभागाची वाहने, ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींची शासकीय, खासगी वाहने, शासकीय वाहने, महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांची वाहने व कामावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची खासगी वाहने (शासकीय ओळखपत्र पाहून) व ज्या स्वयंसेवी संस्था पूर परिस्थितीत काम करत आहेत त्यांची वाहने, एनडीआरएफ, एसडीआरएफ, व्हाईट आर्मी, विमानतळ प्राधिकरणाची वाहने, मदतकार्य करणाऱ्या वाहनांना पेट्रोल व डिझेल देण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.

---

Web Title: Only for petrol-diesel essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.