‘पॉवर फॅक्टर’ नियंत्रित ठेवला, तरच ‘रिफंड’ मिळणार : राजू पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 03:46 PM2019-01-22T15:46:27+5:302019-01-22T15:48:07+5:30
कोल्हापूर : पॉवर फॅक्टर नियंत्रित ठेवला, तरच उद्योजकांना या पेनल्टीचा रिफंड टप्प्याटप्प्याने मिळणार आहे; त्यामुळे कोल्हापुरातील उद्योजकांनी पॉवर फॅक्टरवर ...
कोल्हापूर : पॉवर फॅक्टर नियंत्रित ठेवला, तरच उद्योजकांना या पेनल्टीचा रिफंड टप्प्याटप्प्याने मिळणार आहे; त्यामुळे कोल्हापुरातील उद्योजकांनी पॉवर फॅक्टरवर सातत्याने नियंत्रण ठेवावे, असे आवाहन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष राजू पाटील यांनी केले.
अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, पॉवर फॅक्टरसाठी आवश्यक संच मांडणीमध्ये बदल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी वीज नियामक आयोगाकडे उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यावर वीज नियामक आयोगाने दि. ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदत देण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार अमल महाडिक यांनी संबंधित आदेशाची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे दिली.
पॉवर फॅक्टर पेनल्टीचा रिफंड हा सर्वांना मिळणार, असा समज उद्योजकांचा झाला आहे; मात्र, तशी वस्तुस्थिती नाही. वीज नियामक आयोगाने काही अटींवर मुदतवाढ दिली आहे. त्यातील पॉवर फॅक्टर नियंत्रित ठेवण्याच्या अटीचा त्यामध्ये समावेश आहे. जे उद्योजक दि. १ एप्रिलपर्यंत पॉवर फॅक्टर नियंत्रित ठेवतील, त्यांनाच पेनल्टीचा रिफंड टप्प्याटप्प्याने मिळणार आहे.
अडचण असल्यास संपर्क साधावा
वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशाची प्रत ह्यस्मॅकह्णला मिळाली आहे. पॉवर फॅक्टरबाबत काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास उद्योजकांनी स्मॅक कार्यालयात संपर्क साधावा. त्यांना ती आवश्यक माहिती दिली जाईल, असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.