कोविड व्यक्तीच्या संपर्कातील शिक्षकांनीच चाचणी करून घ्यावी : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 10:37 AM2020-11-21T10:37:18+5:302020-11-21T10:38:41+5:30
teacher, kolhapur, coronavirus सरसकट सर्वच शिक्षकांनी कोविड चाचणी करून न घेता कोविड लक्षणे असल्यास किंवा लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील शिक्षकांनीच स्राव तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केले.
कोल्हापूर : सरसकट सर्वच शिक्षकांनी कोविड चाचणी करून न घेता कोविड लक्षणे असल्यास किंवा लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील शिक्षकांनीच स्राव तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केले.
इयत्ता नववी ते १२वीच्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोविड चाचणीकरिता स्राव घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील चार दिवसांत जवळजवळ पाच हजारांच्या वर स्राव घेण्यात आले आहेत. त्यामुळे स्राव तपासणीला वेळ लागू शकतो.
परिणामी प्रयोगशाळेकडून अहवाल मिळण्यास विलंब होईल. म्हणूनच पुढील आदेश होईपर्यंत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्राव देण्यासाठी जाऊ नये; तसेच मुख्याध्यापकांनीही कोणत्याही शिक्षकास व कर्मचाऱ्यास स्राव घेण्यासाठी पाठवू नये. फक्त कोविडची लक्षणे असल्यास किंवा कोविड लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचेच स्राव घेण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.