...तरच समाज, संस्कृती वाढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:09+5:302020-12-29T04:24:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दानोळी : ज्या समाजाची संस्कृतीची उंची वाढत नाही, तो समाज संपत आहे. साहित्यिक, लेखक, पत्रकार यांच्यासह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दानोळी : ज्या समाजाची संस्कृतीची उंची वाढत नाही, तो समाज संपत आहे. साहित्यिक, लेखक, पत्रकार यांच्यासह समाजाचा आरसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वांनीच ग्रामीण भागातल्या समस्या ताकदीने मांडल्या पाहिजेत. तरच समाज, संस्कृती वाढेल, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांनी केले.
निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे साहित्य सुधा कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंचाकडून रविवार, २७ डिसेंबर रोजी २४ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला ग्रंथदिंडीने सुरुवात झाली. महादेव मंदिरामध्ये डॉ. सुकुमार मगदूम, शुभांगी मगदूम, धवल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. यामध्ये रत्नसागर हायस्कूलचे विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन प्राचार्य श्रीधर हेरवाडे, विठ्ठल मोरे, संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यक खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्य सुधा या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. दुपारी ‘नवे कृषी कायदे, वास्तव व अपेक्षा’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी प्रा. डॉ. मोहन पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार होते.
या संमेलनाला डॉ. महावीर अक्कोळे, आप्पालाल चिकोडे, आण्णासाहेब क्वाणे, प्रा. शांताराम कांबळे, सुकुमार पाटील, अशोक जाधव, गोमटेश पाटील, रावसाहेब पाटील, संजय पाटील, मनोज पाटील, रफीक सुरज यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली होती. प्रास्ताविक पद्माकर पाटील यांनी केले. संगीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले.
चौकट - पुरस्कारांचे वितरण
साहित्य सुधा मंचाकडून ‘दे. भ. डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार’ कोथळीचे कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी, ज्येष्ठ साहित्यिक पी. बी. पाटील यांना देण्यात आला. तर ‘साहित्यरत्न पुरस्कार’ अब्दुललाटचे ज्येष्ठ साहित्यिक आदिनाथ कुरुंदवाडे यांना तसेच कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘शेतकरी राजा’ हा पुरस्कार धरणगुत्तीचे भास्कर शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
फोटो - २७१२२०२०-जेएवाय-०३
फोटो ओळ - निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे आयोजित मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांनी मनोगत व्यक्त केले.