संभाजीराजेंच्या संयमी नेतृत्त्वाखालीच मराठा आरक्षण लढ्याला यश मिळेल  : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 06:31 PM2021-06-12T18:31:58+5:302021-06-12T18:36:11+5:30

Sambhaji Raje Chhatrapati HasanMusrif Kolhapur : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजेंनी पुन्हा मोर्चे काढावेत, आंदोलन करावे, लोकांना उठवावे असे चंद्रकांतदादांना वाटते.परंतु,कोरोना महामारीत संभाजीराजेंनी घेतलेली संयमाची भूमिकाच योग्य आहे.त्यांच्या संयमी नेतृत्त्वाखालीच आरक्षणाच्या लढ्याला यश येईल,असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी व्यक्त केला.

Only under Sambhaji Raje's restrained leadership will the Maratha reservation fight succeed: Mushrif | संभाजीराजेंच्या संयमी नेतृत्त्वाखालीच मराठा आरक्षण लढ्याला यश मिळेल  : मुश्रीफ

गडहिंग्लज येथील पत्रकार परिषदेत बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ शेजारी चंदगडचे आमदार राजेश पाटील.

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लज येथील पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा विश्र्वास चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा समाचार

गडहिंग्लज : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजेंनी पुन्हा मोर्चे काढावेत, आंदोलन करावे, लोकांना उठवावे असे चंद्रकांतदादांना वाटते.परंतु,कोरोना महामारीत संभाजीराजेंनी घेतलेली संयमाची भूमिकाच योग्य आहे.त्यांच्या संयमी नेतृत्त्वाखालीच आरक्षणाच्या लढ्याला यश येईल,असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी व्यक्त केला.

शुक्रवारी (११) कोल्हापूर येथील एका कार्यक्रमाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'मोर्चा काढायचे रद्द करून राज्य सरकारला मराठा आरक्षणाच्या संकटातून वाचवण्यासाठी आपण मदत करताय कां? असा थेट सवाल खासदार संभाजीराजे यांना विचारला होता.याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादांच्या 'त्या' वक्तव्याचा खरपूस समाचारच घेतला.

गडहिंग्लज उपविभागातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीसाठी मुश्रीफ गडहिंग्लजला आले होते.आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील हेही उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले,चंद्रकांतदादांना नेमकं काय झालयं माहित नाही.राज्याची सत्ता गेल्यामुळेच ते अस्वस्थ आहेत. मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लोकांचे काय हाल झाले याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळेच ते संयमाने जात आहेत. सध्या अशा संयमी नेतृत्वाची गरज आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीने फेरविचार याचिकेबाबत पर्याय दिला आहे.त्यादृष्टीने राज्य सरकारची तयारी सुरु आहे.महाविकास आघाडी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची सरकारची तयारी आहे.त्यामुळेच संभाजीराजेंचाही आघाडी सरकारवर विश्र्वास आहे, असेही मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी कोल्हापूरात चर्चा.. !

सोमवारी(१४) उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना परिस्थितीच्या आढाव्यासाठी कोल्हापूरला येत आहेत.त्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे.आरक्षणात घटनात्मक पेच निर्माण झाला असला तरी मराठा बांधवांचे जे छोटे- छोटे प्रश्न,मागण्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी बैठकीत प्रयत्न केला जाईल,असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Only under Sambhaji Raje's restrained leadership will the Maratha reservation fight succeed: Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.