क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 04:20 PM2020-01-03T16:20:49+5:302020-01-03T16:38:07+5:30

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले

Only the unity of revolutionaries will save the country: Chhagan Bhujbal | क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळ

क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळ

googlenewsNext
ठळक मुद्देक्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळसावित्रीबाई फुले यांना नायगावमध्ये अभिवादन

खंडाळा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार शशिकांत शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, नितीन बानगुडे-पाटील, कमलताई ढोले-पाटील, बापूसाहेब भुजबळ, सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपाली साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रा. हरी नरके, मंजिरी धाडगे, राजेंद्र नेवसे, सरपंच सुधीर नेवसे, उपसरपंच सीमा कांबळे उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ह्यनायगावच्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम खडतर परिस्थितीमध्ये सुरू केले. शेती आणि उद्योगाचे ज्ञान शिक्षणातून दिले पाहिजे, हा विचार महात्मा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी मांडला. महिलांच्या शिक्षणासाठी ज्यांनी बीजं रोवली, त्या सावित्रीबार्इंनाच शिक्षणाची खरी देवता मानली पाहिजे.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील युगपुरुषांची जन्मगाव जिल्ह्याचे वैभव आहे.

सावित्रीबार्इंचे कार्य महिलांसह समाजाला प्रेरणादायी आहे. नायगावचा विकास आणि फुले दाम्पत्यांच्या विचारावर महाराष्ट्राची विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी छगन भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. नायगावच्या विकास आराखड्यासाठी विशेष बैठक घ्यावी. मांढरदेव रस्ता आराखडा तयार आहे, तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत.ह्ण
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी स्वागत केले. सरपंच सुधीर नेवसे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी आभार मानले.

उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करणार

नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे. त्यासाठी दरवर्षी एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्याचे नियोजन करणार आहे. त्यामुळे महिलांच्या चांगल्या कामाचा गौरव आणि इतरांना स्फूर्ती मिळेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Only the unity of revolutionaries will save the country: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.