कुत्री पकडण्यासाठी एकच व्हॅन-- कुत्र्यांचा जोर... नागरिकांना घोर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:15 AM2018-07-08T01:15:14+5:302018-07-08T01:15:27+5:30

शहरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी गेल्या आठ वर्षांत महापालिकेने काहीच केले नाही. घोषणा आणि आश्वासनाचे गाजर दाखवायचे, लोकांची ओरड कमी झाली की, सर्व विसरून जायचे, असा प्रघात पडला आहे.

The only van to catch a dog - The thrush of the dogs ... | कुत्री पकडण्यासाठी एकच व्हॅन-- कुत्र्यांचा जोर... नागरिकांना घोर..

कुत्री पकडण्यासाठी एकच व्हॅन-- कुत्र्यांचा जोर... नागरिकांना घोर..

googlenewsNext

चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी गेल्या आठ वर्षांत महापालिकेने काहीच केले नाही. घोषणा आणि आश्वासनाचे गाजर दाखवायचे, लोकांची ओरड कमी झाली की, सर्व विसरून जायचे, असा प्रघात पडला आहे.
याला प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची अनास्थाच कारणीभूत आहे. तीन महिन्यांपूर्वी महापालिकेच्या मदतीला एक स्वयंसेवी संस्था धावली आणि शहरातील कुत्र्यांची नसबंदी सुरू झाली आहे. मात्र, कुत्री पकडण्यासाठी महापालिकेकडे केवळ दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी आणि एकच व्हॅन आहे.

‘जीवरक्षा अ‍ॅॅनिमल वेलफेअर ट्रस्ट’ असे या संस्थेचे नाव. कल्पना भाटिया यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था कोल्हापुरात कार्यरत आहे. या संस्थेने कुत्र्यांची नसबंदी मोफत करून देण्याची तयारी महापालिकेला दर्शविली. अट फक्त एकच होती की, कुत्री महापालिकेने पकडून आणून द्यावयाची. हा प्रस्ताव महापालिकेने मान्य केला. त्यानंतर आयसोलेशन हॉस्पिटलजवळ कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आॅपरेशन थिएटर उपलब्ध करून दिले. मात्र, मोकाट कुत्री पकडून आणून द्यायला सुरुवात जूनमध्ये केली. तत्पूर्वीच संस्थेने नागरिकांना ‘भटकी कुत्री आणून द्या नसबंदी करू,’ असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाला आणि एप्रिल-मे या दोन महिन्यांत २८० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. त्यानंतर महापालिकेची डॉग व्हॅन मोकाट कुत्री आणून देऊ लागली. जूनमध्ये ९० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत सुमारे ३७० कुत्र्यांची नसबंदी केली आहे. शहरात २० हजारांवर कुत्री आहेत. ही संख्या लक्षात घेता या गतीने नसबंदीचे काम पूर्ण होणार कधी? हा प्रश्नच आहे.

हॉटेल परिसरात भटक्यांंची झुंड
त्यामुळेच ही सर्व दुकाने आणि हॉटेल्सच्या परिसरात कुत्र्यांच्या झुंडी आढळतात. या झुंडी म्हणजे दहशतवाद्यांच्या टोळ्याच आहेत. या टोळ्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यात गेल्या दोन महिन्यांत अनेकजण जखमी झाले आहेत. कुत्रा चावल्यास त्याला रेबिज प्रतिबंधक लस द्यावी लागते. शासकीय रुग्णालयात या लसींचा नेहमीच तुटवडा असतो.


पालकमंत्र्यांच्या पाठबळामुळेच...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संस्थेला देऊ केलेल्या देणगीमुळेच जीवरक्षा अ‍ॅनिमल वेलफेअर ट्रस्टने कुत्र्यांची मोफत नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला. महापालिकेनेही तो मान्य केला. शस्त्रक्रिया केल्यानंतर साधारणपणे तीन दिवस त्या कुत्र्याला निरीक्षणाखाली ठेवावे लागते. सध्या पावसाळ्यामुळे जखम लवकर भरून येत नसल्याने सहा दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. पाऊस कमी झाल्यानंतर नसबंदी शस्त्रक्रियांची गती वाढेल, असे या ट्रस्टच्या अध्यक्षा कल्पना भाटिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

हॉटेल परिसरात भटक्यांंची झुंड
अन्न आणि औषध प्रशासनाकडे नोंद असलेल्या शहर आणि जिल्ह्यातील चिकन आणि मटन दुकानांची संख्या १०६० आहे. चिकन-६५ ची १२२, चायनीजची २१९ दुकाने आहेत. २७०० हॉटेल्स आहेत.
याशिवाय हातगाड्यांवर सुरू असणाºया चिकन-६५च्या तसेच अन्य खाद्यपदार्थांच्या गाड्यांची संख्याही मोठी आहे.
या दुकानातील शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ जवळच्याच कचरा कोंडाळ्यात किंवा गटारीत टाकले जातात. मोकाट कुत्री त्यावरच जगतात. त्यामुळेच ही सर्व दुकाने आणि हॉटेल्सच्या परिसरात कुत्र्यांच्या झुंडी आढळतात. (क्रमश:)
 

Web Title: The only van to catch a dog - The thrush of the dogs ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.