कोल्हापूर शहरात महिलांसाठी ओपन जीम करा, महिला बाल कल्याण समिती सभेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:27 PM2018-07-28T12:27:13+5:302018-07-28T12:35:29+5:30

कोल्हापूर शहरातील सर्व प्रभागात महिलांसाठी ओपन जीम कराव्यात, अशा मागणीचा ठराव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभेत करण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची सभा  छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सुरेखा शहा होत्या.

Open GEM for women in Kolhapur city, resolution in women's welfare committee meeting | कोल्हापूर शहरात महिलांसाठी ओपन जीम करा, महिला बाल कल्याण समिती सभेत ठराव

कोल्हापूर शहरात महिलांसाठी ओपन जीम करा, महिला बाल कल्याण समिती सभेत ठराव

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर शहरात महिलांसाठी ओपन जीम करामहिला बाल कल्याण समिती सभेत ठराव

कोल्हापूर : शहरातील सर्व प्रभागात महिलांसाठी ओपन जीम कराव्यात, अशा मागणीचा ठराव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभेत करण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची सभा  छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सुरेखा शहा होत्या.

महिला व बालकल्याण समिती सभेतील विषय पत्रिकेवरील समितीच्यावतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये महिलांकरिता ओपन जीम बसवून मिळणे, कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये महिला बालकल्याण समितीमार्फत महिलांकरिता ओपन जीमचे साहित्य बॅक एक्स्टेशन उपकरण प्रभाग क्रमांक ४, ७, ७९, १०, १८, २९, ३८, ७०, ७८, ८० या प्रभागांत प्रत्येकी एक व प्रभाग क्रमांक ६८ मध्ये ३ ठिकाणी बसविण्याबाबतचा सदस्य ठरावावर सभागृहात चर्चा होऊन सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी उपसभापती छाया पोवार, शमा मुल्ला, अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर, मेहजबीन सुभेदार, माधुरी लाड, ललिता ऊर्फ अश्विनी बारामते, मनीषा कुंभार, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी दिलीप पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे, महिला बालकल्याण विभागाचे सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक उषा सरदेसाई, कनिष्ठ अभियंता दत्ता पाटील, प्रोजेक्ट विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुणकुमार गवळी, आरोग्य निरीक्षक माधवी मसुरकर, नागरी उपजीविका अभियानाचे निवास कोळी, रोहित सोनुले, आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Open GEM for women in Kolhapur city, resolution in women's welfare committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.