पाटपन्हाळ्यात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खुला करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:30+5:302021-06-05T04:17:30+5:30
पाटपन्हाळा येथे कासारी नदीवर असणाऱ्या लहान पुलावर पावसाळ्यात पाणी येत असल्यामुळे दळवळणासाठी अडचणी येत होत्या. मागील वर्षी येथे पंतप्रधान ...
पाटपन्हाळा येथे कासारी नदीवर असणाऱ्या लहान पुलावर पावसाळ्यात पाणी येत असल्यामुळे दळवळणासाठी अडचणी येत होत्या. मागील वर्षी येथे पंतप्रधान सडक योजनेतून नवीन पूल झाला. मात्र या पुलाला भराव टाकण्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे येथील तीन शेतकऱ्यांकडून भूसंपादन करण्यात आले होते. भराव टाकून पुलाच्या भरावाच्या बाजूने शिल्लक सार्वजनिक बांधकामाच्या जमिनीतून गावच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला होता.
पण या तीन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच अतिक्रमण करून शेती करण्यास सुरुवात केली होती. यासाठी ग्रामपंचायतीने मोजणी आणून या जागेवर रस्त्यासाठी रेखांकन केले होते. पण या शेतकऱ्यांना याला दाद दिली नाही. यामुळे सरपंच संदीप पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती पण कारवाई झाली नव्हती. यामुळे सरपंचांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली. यानंतर परिस्थितीची चौकशी करून प्रांताधिकारी बी. आर. माळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अतिक्रमित जागा ताब्यात घेऊन स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खुला करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकट
पुलाला भराव टाकताना शिवलिंग तेली, उत्तम तेली, बाजीराव पाटील या शेतकऱ्यांची जागा संपादित केली आहे. पण जुन्या पुलासाठी संपादित केलेल्या जमिनीतून शिल्लक चार गुंठे जमिनीतून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाजीराव पाटील या शेतकऱ्याने आपली जमीन गेली म्हणून अतिक्रमण केले आहे.