शिवाजी विद्यापीठातील अभ्यासिका आठ दिवसांत खुली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:24 AM2020-12-29T04:24:37+5:302020-12-29T04:24:37+5:30
विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या (ग्रंथालय) प्रवेशद्वारात एआयएसएफ आणि एआयवायएफ यांच्यावतीने निर्दशने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा ...
विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या (ग्रंथालय) प्रवेशद्वारात एआयएसएफ आणि एआयवायएफ यांच्यावतीने निर्दशने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा दिल्या. ग्रंथालय, अभ्यासिका सुरू करण्याची मागणी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन, निवेदनाच्या माध्यमातून विद्यापीठ प्रशासनाकडे केली. या मागणीबाबत कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. पण, त्यानंतर काहीच झाले नाही. त्यामुळे या मागण्यांसाठी आम्ही पुन्हा आंदोलन केले असल्याचे एआयवायएफचे राष्ट्रीय वर्किंग कौन्सिल मेंबर गिरीश फोंडे यांनी दिली. मागण्यांचे निवेदन विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांना देण्यात आले. या आंदोलनात प्रशांत आंबी, आरती रेडेकर, राम करे, रवींद्र जाधव, केदार तहसीलदार, समाधान मासाळ, हर्षवर्धन कांबळे, रोहित कांबळे, सुनील कोळी, संदेश माने सहभागी झाले.
चौकट
वसतिगृह सुरू करावीत
पीएच.डी. प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे; पण विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी, राहण्यासाठी वसतिगृह खुली केलेली नाहीत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वसतिगृह सुरू करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
फोटो (२८१२२०२०-कोल-एआयवायएफ आंदोलन) : शिवाजी विद्यापीठात सोमवारी ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्यावतीने सोमवारी निर्दशने करण्यात आली.