हेरिटेज अन् पर्यावरणवाद्यांचे बेगडी प्रेम उघड
By Admin | Published: March 14, 2016 12:34 AM2016-03-14T00:34:27+5:302016-03-14T00:50:12+5:30
पर्यायी पुलातील अडथळ्यांवर हातोडा : कामात हरकत घ्यायला पुढे व हेरिटेज वास्तू पाडायलाही पुढे
पुष्पलता लोणारे यांचे प्रतिपादन : बंसीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र शाळेत कार्यकारिणीची सभा
भंडारा : विद्यालयामध्ये विद्यार्थी हा केंद्र आहे. त्यामुळे विद्यार्थी पालक व शिक्षक असा त्रिकोणीय संगम असल्याने विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्रिकुटाची गरज आहे, असे प्रतिपादन सभेच्या अध्यक्षा मुख्याध्यापक पुष्पलता लोणारे यांनी केले.
बं.ला. नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा येथे शनिवारी आयोजित शिक्षक पालक संघ व माता पालक संघाच्या कार्यकारिणीच्या सभेत अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. वर्ग ५ ते ९ या वर्गातील विद्यार्थ्यांच्या माता पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लोणारे तर, उपाध्यक्ष म्हणून पत्रकार राजू आगलावे तसेच उपमुख्याध्यापक टिचकुले, पर्यवेक्षक बारई, राठी व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा कल्पना बनकर आदी उपस्थित होते. सभेमध्ये शिक्षक देशभ्रतार यांनी अहवाल वाचन करून त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती व उपक्रम तसेच नियोजन व उद्दिष्ट याबाबत माहिती दिली. सभेमध्ये मराठी शाळा ओस का पडत आहेत त्यावर उपाय तसेच वर्षभरातील विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यांची प्रगती आदीसह इतर गोष्टींसाठी उपस्थितांच्या प्रश्नोत्तरातून एकमेकांचे निराकरण करण्यासाठी सभोचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.मुख्याध्यापिका लोणारे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी माता पालक शिक्षक, विद्यार्थी या त्रिकुटांचा संगम व्हावा यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे महत्वाचे असून शैक्षणिक प्रवाहात असताना येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त शिक्षकांना सुद्धा प्रोत्साहन मिळणे तितकेच महत्वाचे आहे. वर्ष अखेरी जेव्हा शाळेमध्ये निरोप समारंभ कार्यक्रम होतो. त्यावेळी शाळेतील विद्यार्थी हे वर्षभराच्या शिक्षक व शिक्षिकांच्या व शाळा व्यवस्थापनाचा गोषवारा देतात आणि सोबत शाळेतील आठवणींची शिदोरी सोबत नेत असतात. तेव्हा शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांची एकच अपेक्षा असते की आपला विद्यार्थी उत्तम घडून तो अधिकारी व्हावा व शाळेचे नावलौकीक करावे.
उपस्थित माता पालक व शिक्षक यांनी संवाद घालून विद्यार्थ्यांच्या असलेल्या समस्या, त्यांच्या जबाबदाऱ्या व अडचणी यावर प्रश्न उपस्थित करून त्यावर उत्तरे देवून एकमेकांचे समाधान करण्यात आले. संचालन शिक्षक देशभ्रतार यांनी तर, आभार आरोही अल्लडवार यांनी मानले. सभेला हिरामण बारापात्रे, बाबूराव ठाकरे, कल्पना बनकर, राजू आगलावे, रेखा रामटेके, आकाश धुर्वे, पूजा टांगले, नलिनी सेलोकर, शाईन इनायत खान, प्रिती केवट, के.व्ही. निमजे आदी माता पालक तसेच विद्यालयाच्या शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)