‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’चे आज उद्घाटन

By Admin | Published: February 27, 2015 11:01 PM2015-02-27T23:01:09+5:302015-02-27T23:22:14+5:30

गृहस्वप्नाच्या पूर्ततेची सुवर्णसंधी : पुणे, कोल्हापुरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

Opening of 'Lokmat Property Showcase-2015' today | ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’चे आज उद्घाटन

‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस-२०१५’चे आज उद्घाटन

googlenewsNext

कोल्हापूर : स्मार्ट सिटी, विद्यानगरी असलेले पुणे व कलानगरी असलेल्या कोल्हापुरातील गृहस्वप्नांची पूर्तता करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र व गोव्यामध्ये अग्रणी असलेल्या ‘लोकमत’ समूहाने ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस - २०१५’ या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या व भव्य अशा या गृहप्रदर्शनाचे आज, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘क्रिडाई’ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव परिख, ‘क्रिडाई’ कोल्हापूरचे अध्यक्ष गिरीश रायबागे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.प्रदर्शन आज, शनिवारी व उद्या, रविवारी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. यात पुणे, कोल्हापुरातील नामांकित व आघाडीचे बांधकाम व्यावसायिक त्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करणार आहेत. स्वत:ला हवे तसे आणि मनासारखे घर पाहण्यासाठी विविध परिसरांत फिरावे लागते, धावपळ होते. ही ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या प्रदर्शनात ‘एकाच छताखाली’ पुण्यासह कोल्हापुरात सुरू असलेल्या आणि येऊ घातलेल्या गृहप्रकल्पांची सहजपणे माहिती मिळणार आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत अशा सर्वस्तरांतील ग्राहकांसाठी घर निवडण्याचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. ‘वन बीएचके’पासून प्रीमियम लक्झुरिअस फ्लॅट, रो हाऊस, बंगलो, फ्लॅटपर्यंत तसेच पुणे आणि कोल्हापुरातील व्यावसायिक मिळकतींचे प्रकार येथे पाहता येतील. कोल्हापूरकरांना त्यांच्या परिसरातील, गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. स्वप्नातील घराची पूर्तता करण्याची सुवर्णसंधी ‘लोकमत’ने या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या प्रदर्शनानिमित्त मिळणाऱ्या विशेष सवलतीतील दरांचाही फायदा ग्राहकांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)

तासाला जिंका चांदीची नाणी!
हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रत्येक तासाला एक ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. त्यातील भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी दिली जाणार आहेत.

सहभागी बांधकाम व्यावसायिक
कोल्हापुरातील व्यावसायिक : वेदार्जुन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, रायसन्स कन्स्ट्रक्शन्स, मिरजे इस्टेट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इम्राल्ड प्रॉपर्टीज, कुराडे बिल्डर्स, क्रिडाई - इचलकरंजी, प्रतीक टाऊनशिप अ‍ॅण्ड इन्फ्रा प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड, निवारा निर्माण डेव्हलपर्स, रामसिना ग्रुप, पूजा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड, एस. ए. मगदूम प्रमोटर्स अ‍ॅण्ड बिल्डर्स.
पुण्यातील व्यावसायिक : भंडारी असोसिएटस, द स्केपर्स इन असोसिएशन विथ जी. मित्तल अ‍ॅण्ड सन्स, कोठारी ब्रदर्स, त्रिमूर्ती ग्रुप, सुमेरू डेव्हलपर्स, सिटी कॉर्पोरेशन, श्री मंगल प्रोजेक्टस, दरोडे-जोग प्रॉपर्टीज, सिद्धिविनायक ग्रुप्स, नाईकनवरे डेव्हलपर्स, स्काय आय डेव्हलपर्स, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स, श्री व्यंकटेश बिल्डकॉन, मॅपल शेल्टर, एक्सलन्स शेल्टर, पृथ्वी एडिफाईस.

Web Title: Opening of 'Lokmat Property Showcase-2015' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.