जनाधार नसलेल्या राणेंकडून प्रसिद्धीसाठीच टीका, शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांचे राणेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 05:07 PM2017-12-10T17:07:37+5:302017-12-11T12:14:12+5:30

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.

Opinion for publicity by non-OBCs, Rane's reply to Shiv Sena's Arun Dudhwadkar | जनाधार नसलेल्या राणेंकडून प्रसिद्धीसाठीच टीका, शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांचे राणेंना प्रत्युत्तर

जनाधार नसलेल्या राणेंकडून प्रसिद्धीसाठीच टीका, शिवसेनेच्या अरुण दुधवडकर यांचे राणेंना प्रत्युत्तर

Next
ठळक मुद्देसभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेठाकरे विधानभवनात पाठवतातराणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळसिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?

कोल्हापूर : दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नारायण राणे यांना जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे मात्र यापुढे ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला आहे.

शुक्रवारी कोल्हापूरच्या सभेत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुधवडकर यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार वैभव नाईक, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते. दुधवडकर म्हणाले, राणे यांनी तीच तीच कॅसेट वाजवण्यापेक्षा त्यांचे चरित्रच लिहून लोकांना वाटावे. १२ वर्षांपूर्वी त्यांचा आमचा संबंध संपला आहे. मातोश्रीवरील टीका यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. तुमच्या पक्षाची बांधणी करा, आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र शिवसेना आणि ठाकरेंवर तोंडसुख घेण्याचे कारण नाही.

सर्व प्रचारमोहिमा कोकणातून सुरू करणा-या राणेंना कोल्हापुरात येण्याची गरज का पडावी, असा सवाल उपस्थित करून त्यांनी विनय कोरे, महादेव जानकर यांच्या पक्षाची काय अवस्था आहे ती पाहावी, असा सल्लाही यावेळी दिला. कॉंग्रेसमध्ये असताना सोनियांचे पाय यांना सोन्याचे दिसले. आता यांना मुख्यमंत्री आदरणीय वाटायला लागलेत. आम्ही त्यांना विरोध केला नाही. त्यांना मंत्री करणार की संत्री हे त्यांनीच त्यांना ज्यांनी शब्द दिलाय त्यांना विचारावं, असा टोलाही दुधवडकर यांनी यावेळी राणे यांना लगावला.

सभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हते

कोल्हापूरच्या सभेला कोल्हापूरचे कोण होते असा प्रश्न उपस्थित करून त्यांचे जुने सहकारी सुरेश साळोखे हे देखील या सभेला नव्हते. ती कोल्हापूरचे करमणूक करणारी सभा होती. कोल्हापूरच्या सहा आमदारांचे काय ते आम्ही बघू. चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही प्रयत्न केले. परंतु पुढच्या वेळी आणखी दोन आमदार वाढवून आणू असे दुधवडकर म्हणाले.

ठाकरे विधानभवनात पाठवतात

उद्धव ठाकरे यांनी विधानभवन कधी पाहिले का असे नारायण विचारतात. पण ठाकरे विधानभवनात जात नाहीत तर तेथे शिवसैनिकांना पाठवतात. ही लिमिटेड कंपनी नसल्यानेच हा मिल कामगाराचा मुलगा बेस्टचा अध्यक्ष झाला. वैभव नाईक, राजेश क्षीरसागर आमदार झाले, असे दुधवडकर म्हणाले.

राणेंचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळ

राणे यांचा पक्ष म्हणजे भाजपाचे बांडगूळ असल्याची टीका यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली. यांना शिवसेनेने घेतले नाही, कॉंग्रेसवाले कंटाळले. म्हणून मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी हा पक्ष काढलाय. यांना आमदार करायचे, मंत्री करायचे हे उद्धव ठाकरेच ठरवणार कारण यांना शब्द देणारे उद्धव ठाकरे यांचा सल्ला घेतात. यांना यांच्या मुलाच्या आमदारकीची काळजी आहे. मात्र यांच्यासोबत शिवसेना सोडणा-यांची तेवढी काळजी यांनी केली, असा सवाल आमदार नाईक यांनी यावेळी उपस्थित केला. हे आणि यांची दोन मुलं यांचा हा पक्ष म्हणजे ख-या अर्थानं प्रा. लि. कंपनी आहे.

सिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात काय करणार ?

जे स्वत: सिंधुदुर्गात संपले आहेत ते कोल्हापुरातील शिवसेनेच्या आमदारांना काय संपवणार, असा सवाल यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या राणे यांनी आमचे पुनर्वसन करण्याची गरज नाही. त्यांची लायकी तरी काय आहे, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी राणेंवर टीका केली. विधानसभेच्या आधी होणा-या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचा खासदार येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

Web Title: Opinion for publicity by non-OBCs, Rane's reply to Shiv Sena's Arun Dudhwadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.