गरजेनुसार बदलाची संधी हवी, अंतराचे निकष पाळावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 04:12 PM2020-03-06T16:12:42+5:302020-03-06T16:26:30+5:30
बृहत् आराखड्यात गरजेनुसार बदल करण्याची संधी उपलब्ध असायला हवी. शासनाने महाविद्यालयांमधील अंतराचे निकष पाळावेत, अशी सूचना संस्थाचालक, शिक्षक, प्राचार्य, आदींनी शुक्रवारी केली. नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रमांबाबतच्या प्रस्तावांचा सन २०२१-२२ मधील बृहत् आराखडा तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित बैठकीत त्यांनी सूचना, मते मांडली.
कोल्हापूर : बृहत् आराखड्यात गरजेनुसार बदल करण्याची संधी उपलब्ध असायला हवी. शासनाने महाविद्यालयांमधील अंतराचे निकष पाळावेत, अशी सूचना संस्थाचालक, शिक्षक, प्राचार्य, आदींनी शुक्रवारी केली. नवीन महाविद्यालये, विद्याशाखा, अभ्यासक्रमांबाबतच्या प्रस्तावांचा सन २०२१-२२ मधील बृहत् आराखडा तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित बैठकीत त्यांनी सूचना, मते मांडली.
येथील न्यू कॉलेजमध्ये जिल्हा समन्वयक डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यांनी प्रारंभी विद्यापीठाच्या पंचवार्षिक बृहत् आराखड्याची माहिती दिली.
समिती सदस्य डॉ. ए. एम. गुरव, संस्थाचालक जयंत आसगावकर, शंकरराव कुलकर्णी, प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले, प्रताप माने यांनी सूचना, मते मांडली. या बैठकीस डॉ. आर. आर. कुंभार, योजना जुगळे, एस. बी. भांबर, पी. जी. कुंभार, आदी उपस्थित होते. न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपकुलसचिव डॉ. व्ही. एस. सोयम यांनी आभार मानले.