कोरोना काळात कलागुण विकसित करण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:48+5:302021-07-15T04:17:48+5:30
पेठवडगाव: विजयवंत महोत्सवाच्या माध्यमातून वडगाव व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना वाव मिळत आहे. शाहू शिक्षण प्रसारक सेवा ...
पेठवडगाव: विजयवंत महोत्सवाच्या माध्यमातून वडगाव व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना वाव मिळत आहे. शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्यावतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन पद्धतीने विविध स्पर्धांमध्ये कलागुण विकसित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव विद्या पोळ यांनी केले.
येथील शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्या वतीने विजयवंत महोत्सवाचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने उपाध्यक्ष विजयादेवी यादव,सचिव विद्या पोळ यांच्या उपस्थितीत झाले.
माजी नगराध्यक्षा विजयादेवी यादव यांनी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
१७ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, सामान्य ज्ञान, नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. सरदार जाधव यांनी स्वागत केले. बळवंतराव यादव विद्यालयाचे प्राचार्य पी. बी. पाटील यांनीही विचार मांडले. उपप्राचार्य किरण कोळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रशांत भोरे यांनी केले. यावेळी डॉ.सचिन पवार, आनंदी माने, श्रुती महाजन, दयावती चव्हाण, अरुणा देवस्थळी, शोभा देसावळे आदी उपस्थित होते.
पेठवडगाव: येथील डॉ सायरस पुनावाला स्कूलमध्ये शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्यावतीने विजयवंत महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात दीपप्रज्वालन करताना माजी नगराध्यक्षा विजयादेवी यादव यांच्या हस्ते केले. यावेळी माजी नगराध्यक्षा विद्या पोळ, सचिन पवार, प्राचार्य डाॅ.सरदार जाधव, प्रदीप पाटील, श्रुती महाजन आदी उपस्थित होते.