झेंडावंदनासाठी स्वातंत्र्यसैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:15 PM2020-08-11T17:15:01+5:302020-08-11T17:17:02+5:30

स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यासाठी यंदा अधिकाधिक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामसेवकांना संधी मिळणार आहे. अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे या सूचना दिल्या आहेत.

Opportunity for freedom fighters, anti-dispute committee chairman, gram sevaks for flag waving | झेंडावंदनासाठी स्वातंत्र्यसैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवकांना संधी

झेंडावंदनासाठी स्वातंत्र्यसैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवकांना संधी

Next
ठळक मुद्देझेंडावंदनासाठी स्वातंत्र्यसैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवकांना संधीआता सरपंचपदाऐवजी प्रशासक असल्याने ग्रामविकास विभागाने सुचविले बदल

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्यासाठी यंदा अधिकाधिक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामसेवकांना संधी मिळणार आहे. अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने एका परिपत्रकाद्वारे या सूचना दिल्या आहेत.

राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनामुळे झालेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ध्वज आचारसंहितेनुसार दरवर्षी सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते; परंतु आता सरपंचपदाऐवजी प्रशासक असल्याने त्यात ग्रामविकास विभागाने बदल सुचविले आहेत.

त्यानुसार एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असणाऱ्या प्रशासकांनी एका गावाची निवड करून तेथे ध्वजरोहण करावे. उर्वरित ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांना ध्वजारोहणासाठी प्राधान्य द्यावे. ते नसतील तर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करावे. हे पद रिक्त असेल तर ग्रामसेवकांच्या हस्ते ध्वजारोहण करावे आणि यापैकी काहीच शक्य नसल्यास गटविकास अधिकाऱ्यांनी यासाठी एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Opportunity for freedom fighters, anti-dispute committee chairman, gram sevaks for flag waving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.