डिजिटल तंत्रज्ञानात कोल्हापूरला संधी

By admin | Published: May 3, 2016 12:30 AM2016-05-03T00:30:47+5:302016-05-03T00:39:37+5:30

बाबा कल्याणी : वसंतराव घाटगे यांची जन्मशताब्दी कार्यक्रम; उद्योजकांना मौलिक सल्ला

Opportunity for Kolhapur to Digital Technology | डिजिटल तंत्रज्ञानात कोल्हापूरला संधी

डिजिटल तंत्रज्ञानात कोल्हापूरला संधी

Next

कोल्हापूर : देश सध्या मोठ्या बदलांतून जात आहे. त्यातच आगामी चौथ्या उद्योग क्रांतीमध्ये अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. अशा स्थितीत काही तरी, चांगले घडविण्याची शक्ती व उद्योगांची परंपरा असलेल्या कोल्हापुरातील उद्योजकांनी पुढे यावे. त्यांनी या संधी सोडू नयेत, असे प्रतिपादन भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष बी. एन. (बाबा) कल्याणी यांनी सोमवारी येथे केले.घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट व उद्योग समूहाचे संस्थापक वसंतराव घाटगे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. हॉटेल सयाजी येथील कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर प्रमुख उपस्थित होते. बाबा कल्याणी म्हणाले, जगात सन १९१० ते सन १९७५ झालेल्या औद्यागीक क्रांतीचा आपल्या देशातील औद्यागीक क्षेत्रांवर विविध स्वरूपांत परिणाम झाला. आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या माध्यमातून चौथी औद्यागीक क्रांती येऊ घातली आहे. त्यात जगातील सर्व देशांना समान संधी आहेत. याबाबत अमेरिका, जपान आदी देश नव्या संस्थांची स्थापनेद्वारे तयारी करत आहेत. त्यादृष्टीने आपल्या देशाने पाऊले टाकणे गरजेचे आहे. देशात सुमारे ९० कोटी लोक डिजीटल तंत्रज्ञान, उपकरणांचा वापर करतात. त्यातून अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार कुबेर म्हणाले, कोणताही देश हा व्यवस्था असल्याशिवाय महासत्ता होत नाही. त्यात व्यवस्था म्हणजे नियम व त्यांचे पालन करणे. आपल्या देशाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू ‘मेक इन इंडिया’ असेल तर, व्यवस्था आवश्यक आहे. आपल्याला महासत्ता होण्यासाठी व्यवस्था तयार करण्यासह समाजाला माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे महत्त्वाचे ठरणार आहे शिवाय शिक्षणावरील खर्च वाढविला पाहिजे.
कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश वंदनेने झाला. त्यानंतर जयकुमार पाटील यांच्या पत्नी विजया पाटील यांचा सुलभा दाते यांच्या हस्ते सत्कार झाला. कार्यक्रमास आमदार सतेज पाटील, उद्योगपती बाबाभाई वसा, बाळ पाटणकर, नलिनी देसाई, तारा भडभडे, नूतन किर्लोस्कर आदींसह मान्यवर उपस्थित होते. घाटगे ग्रुपचे अध्यक्ष मोहन घाटगे यांनी ओळख करून दिली. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन तर कार्यकारी संचालक सतीश घाटगे यांनी आभार मानले. .

साथ देणाऱ्यांचा सत्कार
उद्योग विस्तारात वसंतराव घाटगे यांना साथ देणाऱ्या शंकरराव कुलकर्णी, पालवाडकर, एम. डी. जोशी, व्ही. बी. देसाई, विलास पाटील, गणपत पाटील, गायकवाड, विश्वनाथ सहस्त्रबुद्धे यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Opportunity for Kolhapur to Digital Technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.