आजऱ्याला ‘आमदार’कीची संधी ? : ४७ वर्षांनंतर आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:44 PM2018-11-16T23:44:24+5:302018-11-16T23:46:30+5:30

भाजपने न मागता चंदगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी दिली तर लढण्याची तयारी दाखविणारे आजरा येथील अण्णाभाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी व भाजपमधून लढण्यासाठी

 Opportunity for a 'MLA'? : 47 years later hope fills | आजऱ्याला ‘आमदार’कीची संधी ? : ४७ वर्षांनंतर आशा पल्लवित

आजऱ्याला ‘आमदार’कीची संधी ? : ४७ वर्षांनंतर आशा पल्लवित

Next
ठळक मुद्देअशोक चराटी, रमेश रेडेकर यांनी एकसंध राहण्याची गरजदुरंगी लढत झाली तरच भाजपला संधी निर्माण होऊ शकते.

कृष्णा सावंत ।
आजरा : भाजपने न मागता चंदगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची संधी दिली तर लढण्याची तयारी दाखविणारे आजरा येथील अण्णाभाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी व भाजपमधून लढण्यासाठी प्रबळ इच्छुक असलेले उद्योजक रमेश रेडेकर यांच्यात समझोता होऊन दोघांपैकी एकजण रिंगणात उतरल्यास आजरा तालुक्याला मोठ्या कालखंडानंतर पुन्हा आमदारकीची संधी मिळू शकते.

पक्षाने संधी दिल्यास सोडणार नसल्याचे अशोक चराटी सांगत आहेत. चराटी यांचे कार्यकर्तेही अलीकडच्या काळात उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. मात्र, पक्षाने उमेदवारी दिली तरच लढणार, अन्यथा पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका स्पष्टपणे चराटी यांनी घेतली आहे.

रमेश रेडेकर यांनी दोन वर्षांपासून चंदगड विधानसभेची तयारी सुरू केली आहे. संपर्क दौरे, गाठीभेटी जोरदार सुरू आहे. मतदारसंघातील गावे पिंजून काढत आहेत. जिल्हा परिषद सदस्या व त्यांच्या पत्नी सुनीता रेडेकर, मुलगा आदित्य रेडेकर, भाऊ संजय रेडेकर यांच्यासह कार्यकर्तेही गावागावांत जाऊन रेडेकर यांच्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे रेडेकर सध्यातरी तयारीच्या बाबतीत सर्वांत पुढे आहेत.

चराटी यांनी तर ६१ व्या वाढदिवसानिमित्त मेळाव्यात शक्तिप्रदर्शन करून भाजप व शिवसेनेमधील अनेक इच्छुकांना धक्काच दिला. त्यामुळेच अनेकांनी चराटी यांच्यासाठी मंत्रिपदाच्या दर्जाचे पद मिळविण्यासाठी प्रयत्न करूया, अशी विनवणी केली तर काहींनी चराटी यांनी रिंगणात न उतरता आम्हाला आशीर्वाद द्यावा, अशा सूचना केल्या. चराटी यांनी पक्षाने संधी दिली तर लढण्याची इच्छा व्यक्तकेल्याने भाजपमधील अनेक इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे.

रेडेकर यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास रेडेकर यांच्यासाठी मी पुढे राहणार असल्याचे मेळाव्यात चराटी यांनी सांगितले. रेडेकर यांनीही भाजपचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगितल्याने भाजपमधून कुणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे.

सन १९७२ मध्ये माजी आमदार कै. वसंतराव देसाई यांच्या आमदारकीनंतर ४७ वर्षांत आजºयाचा कोणीही आमदार झाला नाही. तालुका तीन विभागांत विभागल्याने तशी संधीही मिळाली नाही. परंतु, संधी चालून आल्याने चराटी किंवा रेडेकर यांच्या रूपाने आजºयाचा आमदार पुन्हा व्हावा, अशी
जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी चराटी व रेडेकर यांच्यात एकसंध होण्याची गरज आहे.

दुरंगी लढत झाली तर संधी
काँगे्रस, राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याने शिवसेना, भाजपही निश्चित एकत्र येणार. राष्ट्रवादीमधून आमदार संध्यादेवी कुपेकर किंवा त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यापैकी एकास उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. परंतु, भाजप-शिवसेनेतून अनेकजण इच्छुक आहेत. भाजपमधून बंडखोरी झाल्यास राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुरंगी लढत झाली तरच भाजपला संधी निर्माण होऊ शकते.
 

शिवसेना, भाजपमध्ये इच्छुकांचा भरणा
शिवसेनेमधून प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खाडेकर, राजेश पाटील इच्छुक आहेत, तर भाजपमधून रेडेकर यांच्यासह माजी राज्यमंत्री भरमू पाटील, गोपाळराव पाटील आणि उमेदवारी दिली तर चराटी या इच्छुकांचा भरणा आहे.

Web Title:  Opportunity for a 'MLA'? : 47 years later hope fills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.