‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ मधून बक्षिसाची संधी

By admin | Published: September 22, 2015 12:20 AM2015-09-22T00:20:50+5:302015-09-22T00:32:21+5:30

मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम : कलर्स आणि ‘लोकमत’ सखी मंच प्रस्तुत आपले बाप्पा, नैवेद्य, हार व पूजा याचा सुरेख संगम

Opportunity for prize through 'Rang Utsavachi, Roop Ganesh' | ‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ मधून बक्षिसाची संधी

‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ मधून बक्षिसाची संधी

Next

कोल्हापूर : गणेशोत्सवानिमित्त ‘कलर्स व लोकमत ‘सखी मंच’ने ‘आपले बाप्पा’ या उत्सवात ‘रंग उत्सवाचे, रूप गणेशाचे’ या कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (दि. २४) सायंकाळी चार वाजता विविध स्पर्धांचे आयोजन डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी येथे केले आहे. यानिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमधून नैवेद्य, हार व पूजा याचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त ‘आपले बाप्पा’ या सोहळ्याचे ‘कलर्स व लोकमत’च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन केले आहे. सुखकर्ता श्री गणेश म्हणजे बुद्धी देवता होय. मोठ्या उत्साहात, दिमाखात या बुद्धी देवतेची आराधना करून तिची यथायोग्य पूजा केली जाते. गणेशाला नैवेद्य, आरती हार-फुले अर्पण करून प्रसन्न केले जाते. संपूर्ण मानवजातीवर गणेशाच्या कृपेचा वरदहस्त राहावा म्हणून आपण गणेशाला साकडे घालत असतो.
संस्कृती जपणाऱ्या ‘कलर्स चॅनेल’वर सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता प्रसारित होणारी ‘बालिका वधू’ ही पारिवारिक व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी व सर्वांत अधिक काळ चालणारी म्हणून जिला बहुमान मिळाला ती मालिका आता दोन हजाराव्या भागाकडे वळते आहे. आपल्या समाजातील बालविवाहाच्या कुप्रथेविरुद्ध लढणाऱ्या आनंदीचा संघर्ष या मालिकेत दाखविला आहे. लहान मुलगी ते सशक्त आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी प्रगल्भ आनंदीचा जीवनप्रवास आणि इतर सामाजिक घडामोडींमुळे मालिका प्रत्येक भागात उत्कंठा वाढविणारी ठरली आहे. आनंदीची हरविलेली मुलगी तिला भेटेल का? ती आनंदीला आपली आई मानेल का? या सर्व प्रश्नांचा उलगडा २००० व्या भागात होणार आहे. अधिक माहितीसाठी सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे (मो. ९६२३८९५८६६) यांच्याशी संपर्क साधावा.

मोदक, पुष्पहार, गणेश रेखाटन स्पर्धा
मोदक स्पर्धा, गणेश रेखाटन स्पर्धा आणि पुष्पहार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदक स्पर्धेसाठी तिखट अथवा गोड मोदक घरातून करून आणायचे आहेत. स्पर्धेच्या ठिकाणी मांडणी करावयाची आहे, त्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. पुष्पहार स्पर्धेसाठी सर्व साहित्य घरून आणावयाचे आहे. स्पर्धेसाठी अर्ध्या तासाचा वेळ आहे. गणेश रेखाटन स्पर्धेसाठी रांगोळीसोबत पाने, फुले, हळद-कुंकू, अष्टगंध याचा वापर करून गणपतीची रांगोळी रेखाटायची आहे. रेखाटन करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सखींसाठी ‘कलर्स चॅनेल’कडून प्रत्येकीला आकर्षक पूजा थाळी भेट देण्यात येणार असून ‘सखी मंच ओळखपत्र’ आवश्यक असून वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


सखींना पैठणी जिंकण्याची संधी
सखींसाठी ‘वन मिनिट गेम शो’चे आयोजन करण्यात आले असून एका भाग्यवान सखीला पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच ‘कलर्स चॅनेलवरील’ ‘बालिका वधू’ मालिकेवर आधारित प्रश्न विचारण्यात येणार असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

Web Title: Opportunity for prize through 'Rang Utsavachi, Roop Ganesh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.