‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहा लाखांहून अधिक बक्षिसे जिंकण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:32 AM2018-01-29T00:32:20+5:302018-01-29T00:33:01+5:30
कोल्हापूर : रांगडी कुस्ती व फुटबॉलची परंपरा जपणाºया कोल्हापूरकरांसाठी ‘लोकमत’ समूहातर्फे प्रथमच यंदा दि. १८ फेबु्रवारीला ‘महामॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात येणार आहे.
‘रन फॉर मायसेल्फ’ अशी साद देत कोल्हापूरकरांसाठी आयोजित केलेल्या या महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या हाफ मॅरेथॉन व सर्वाधिक सहा लाखांहून अधिक बक्षिसांच्या स्पर्धेतील सहभागाबाबत नागरिक, धावपटू, खेळाडूंमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.
औरंगाबाद आणि नाशिकमधील ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या प्रचंड यशानंतर आता कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच यावर्षी महामॅरेथॉन रंगणार आहे.
ही मॅरेथॉन २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर पॉवर रन, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली रन अशा अंतरांची असणार आहे. त्यातील विजेत्यांना पदक आणि सहा लाख रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
‘लोकमत’ने कोल्हापूरकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक, क्रीडाप्रेमींसाठी या महामॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध करून दिली असल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवर, खेळाडू आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोल्हापूरमधील शासकीय अधिकारी, नामवंत डॉक्टर्स, वकील, अभियंते, आदींनी या महामॅरेथॉन स्पर्धेत नोंदणी केली आहे.
शर्यत वयोगट वर्गवारी प्रथम द्वितीय तृतीय
२१ कि.मी १८ ते ४५ पुरुष (खुला) २५,००० २०,००० १५,००० रु
१८ ते ४० महिला(खुला) २५,००० २०,००० १५,००० रु
४५ (वरील) पुरुष (प्रौढ) २५,००० २०,००० १५,००० रु
४० (वरील) महिला (प्रौढ) २५,००० २०,००० १५,००० रु
१८ ते ४५ (वरील) पुरुष (परदेशी) २०,००० १५,०००
१८ ते ४० (वरील) महिला (परदेशी) २०,००० १५,०००
१८ ते ४५ पुरुष (खुला) १५,००० १२,००० १०,०००
१८ ते ४० महिला (खुला) १५,००० १२,००० १०,०००
४५ (वरील) पुरुष (प्रौढ गट) १५,००० १२,००० १०,०००
१० कि.मी ४० (वरील) महिला (प्रौढ गट) १५,००० १२,००० १०,०००
१८ ते ४५ (वरील) पुरुष (परदेशी ) १५,००० १०,०००
१८ ते ४० (वरील) महिला (परदेशी ) १५,००० १०,०००
डिफेन्स कप रन फॉर द कप पुरुष ( ल.दल,पो.) २५,००० २०,००० १५,०००
रन फॉर द कप महिला (ल.दल,पो.) २५,००० २०,००० १५,०००
सहभागासाठी येथे नोंदणी करा
या महामॅरेथान स्पर्धेत सहभागासाठी नावनोंदणीला उत्साहात प्रारंभ झाला आहे. कोल्हापूरकरच्या क्रीडाप्रेमींचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता ६६६. ेंँेंं१ं३ँङ्मल्ल.ूङ्मे/‘ङ्म’ँंस्र४१ या वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९८८१८६७६००, ९६०४६४४४९४ वर नोंदणी करता येणार आहे. ३ फेबु्रवारीपर्यंत नावनोंदणीची संधी आहे.
कोल्हापूरचा नकाशा चे ‘मेडल’
या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली मेडल्स देण्यात येणार आहेत. नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत. धावपटूने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूरमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा बनणार आहे. या चार शहरांमधील मॅरेथॉन जिंकून ही मेडल्स पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.