‘स्टार्टअप’व्दारे शहराच्या समस्या सोडविण्याची युवापिढीला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:32+5:302021-01-16T04:29:32+5:30
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी (www.kolhapurstartupmission.com) या संकेतस्थळावर अर्ज करावेत. त्यातील विजेत्या स्टार्टअप्सना आयआयटी कानपूरच्यावतीने प्रत्येकी पाच लाख बक्षीस देऊन ...
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी (www.kolhapurstartupmission.com) या संकेतस्थळावर अर्ज करावेत. त्यातील विजेत्या स्टार्टअप्सना आयआयटी कानपूरच्यावतीने प्रत्येकी पाच लाख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर हे इन्क्युबेशनसाठी सहकार्य करणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’च्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी दिली. लोकसहभागातून नागरी समस्यांची सोडवणूक हे कोल्हापुरात पहिल्यापासून होत आहे. मात्र, युवापिढीने तंत्रज्ञान, नवकल्पनांच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक केल्यास शहराचा विकास गतीने होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
अशी असेल स्टार्टअप निवड प्रक्रिया
१) स्टार्टअपकडून संकल्पना मागविणे : दि. १५ ते २४ जानेवारी
२) स्टार्टअप कनेक्ट वेबिनार : १८ ते २४ जानेवारी
३) अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्टार्टअपच्या नावांची घोषणा : २६ जानेवारी
४) अंतिम फेरीतील स्टार्टअप्सकडून सादरीकरण : २८ आणि २९ जानेवारी
५) विजेत्या स्टार्टअप्सची घोषणा : ३१ जानेवारी