देशाची दुफळी करणाऱ्या नागरिकत्व कायद्याला विरोध करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:29 AM2019-12-23T03:29:43+5:302019-12-23T03:30:40+5:30

पन्नालाल सुराणा; सोशालिस्ट पार्टीचे कोल्हापुरात अधिवेशन

 Oppose the nation's disruptive citizenship laws, pannalal surana in kolhapur | देशाची दुफळी करणाऱ्या नागरिकत्व कायद्याला विरोध करा

देशाची दुफळी करणाऱ्या नागरिकत्व कायद्याला विरोध करा

Next

कोल्हापूर : देशात दुफळी माजवणाºया नागरिकत्व कायद्याला जनतेने कडाडून विरोध करावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी रविवारी कोल्हापुरात केले. सोशालिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे पाचवे द्वैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन चित्रदुर्ग मठात आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष हसन देसाई होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, माजी आमदार जे. यू. नाना ठाकरे, स्वातंत्र्यसेनानी माधवराव माने, मिरासाहेब मगदूम आदी उपस्थित होते.

सुराणा म्हणाले, केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीरविषयक नीतीचा व दडपशाहीचा निषेध केला पाहिजे. बहुमताच्या जोरावर अशा प्रकारचे कायदे लादणे चुकीचे आहे. श्रीपाल सबनीस म्हणाले, समाजवादाचे ध्येय कार्यकर्त्यांना बळ देणारे आहे, पण सध्यस्थितीत संवादाच्या जागा प्राप्त करण्याचे मोठे आव्हान आहे. समाजवादी नेत्यांनी स्वत:मध्ये बदल करून बेरजेचे राजकारण करावे, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप नेत्यांचा निषेध केला.

अधिवेशनातील ठराव
देशात दुफळी माजविण्याचे दुष्टकर्म थांबवा. शेतकरी, बेरोजगार तरुण, मागास विद्यार्थी यांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवा. सर्व राज्यकारभार मराठीतून चालवावा. बंद केलेल्या मराठी प्राथमिक शाळा चालू कराव्यात. पूरबाधित अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार साहाय्य दोन महिन्यांत द्यावे. मागास जातीजमातीचे विद्यार्थी आश्रम शाळा, बालगृहांचे थकीत अनुदान द्यावे. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी खास प्रयत्न करावेत. पन्नास पैशाचे पोस्ट कार्ड चालू ठेवा.

नवीन जखमा नकोत - कोल्हे
सांगली : देशाच्या फाळणीवेळी झालेल्या जखमा भरण्याची गोष्ट चांगली, पण जुन्या जखमा भरताना नवीन जखमा होणार नाहीत, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी येथे व्यक्त केले. आज देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची ताकद असलेली माणसे केंद्रीय मंत्रिमंडळात नसल्याची टीकाही त्यांनी केली. नव्या सरकारने राज्याची तिजोरी रिकामी असतानाही शेतकºयांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत त्यांनी कर्जमाफीचे स्वागत केले.

Web Title:  Oppose the nation's disruptive citizenship laws, pannalal surana in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.