बाह्यवळण रस्त्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:57 AM2017-08-09T00:57:56+5:302017-08-09T00:57:59+5:30

Opposition to the outlying road | बाह्यवळण रस्त्याला विरोध

बाह्यवळण रस्त्याला विरोध

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रत्नागिरी ते नागपूर राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे, मलकापूर येथून जाणाºया तीन बाह्यवळण रस्त्याच्या जमीन अधिगृहणासाठी झालेल्या सर्वेक्षणाला पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतील शेतकºयांनी मंगळवारी सुनावणीवेळी विरोध दर्शविला. या सर्वेक्षण केलेल्या बाह्यवळण रस्त्यामध्ये अनेक शेतकºयांच्या शेतजमिनी, घरे, विहिरी, नद्या, पूरक्षेत्र जमीन बाधित होत असल्याने यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, अशी मागणी करण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातून १२२ तर पन्हाळा तालुक्यातून ७४ हरकती प्राप्त झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात मंगळवारी हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अरविंद लाटकर आणि राष्टÑीय महामार्ग आॅथॉरिटीचे अधिकारी यांच्यासमोर ही सुनावणी झाली. शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील ज्यांच्या जमिनी या महार्गामुळे बाधीत होणार आहेत असे सर्वच शेतकरी सुनावणीसाठी आल्याने सभागृह खचाखच भरले होते, या हरकतींवर सुनावणीवेळी
अनेक शेतकºयांनी आपले म्हणणे मांडले.
ससेगाव ते येलूर या बाह्यवळण मार्गाचे सर्वेक्षण झाले असले तरीही या मार्गामुळे ३ नद्या, शेतजमिनी, विहिरी, घरे, पूरबाधित क्षेत्र असल्याने त्याला करंजोशी ते ससेगाव ते कोपार्डे (ता. शाहूवाडी) या रस्त्याचा पर्याय शेतकºयांनी सुचविला. कारण पर्यायी रस्त्यामध्ये माळरान व गायरान जमीन असल्याने उदरनिर्वाहाचे साधन जात असल्याचे शेतकºयांनी सुनावणीवेळी सांगितले. सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली सुनावणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
बाधित शेतजमिनीला वाढीव मोबदला मिळावा
या राष्टÑीय महामार्गासाठी शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतजमीन जाणार आहे. या जमिनी बागायत असल्याने शेतकºयांचे नुकसान होणार आहे. या बाधित होणाºया जमिनींना जमीन खरेदी-विक्रीचे नवीन दर ग्राह्य मानून त्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील (पेरिडकर) यांनी सुनावणीवेळी केली. या बाह्यवळण रस्त्यामध्ये आंबा, तळवडे, केर्ले, वारूळ, करंगुळे, वालूर, निळे, यलूर, पेरिड, जाधववाडी, कोपार्ड, नाळेवाडी, सनवाड, ससेगाव, बहिरेवाडी, सावे, गगवे, बांबवडे, डोनोली, चरण, खटाळवाडी, भडळे यांचा समावेश आहे.

Web Title: Opposition to the outlying road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.