काँग्रेसची नोटाबंदी विरोधात निदर्शने

By Admin | Published: January 7, 2017 01:14 AM2017-01-07T01:14:37+5:302017-01-07T01:14:37+5:30

जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन : फसलेल्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी

Opposition protesting against Congress | काँग्रेसची नोटाबंदी विरोधात निदर्शने

काँग्रेसची नोटाबंदी विरोधात निदर्शने

googlenewsNext

इचलकरंजी : ‘देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनतेच्या पदरी दारिद्र्य’ अशी परिस्थिती नोटाबंदीच्या निर्णयामुळे झाली आहे. पूर्णत: फसलेल्या या निर्णयातून मोदी सरकारने शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या हातातील पैसा काढून घेतला आहे, अशा आशयाची टीका येथील शहर कॉँग्रेसच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चावेळी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी प्रांत कार्यालयावर झालेल्या मोर्चातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.
येथील शहर कॉँग्रेसने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे समन्वयक सदस्य रघुजी देसाई, प्रदेश कॉँग्रेस समितीचे समन्वयक ज्ञानज्योत सावंत, माजी मंत्री प्रकाश आवाडे व शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केले.
आंदोलनकर्त्यांसमोर प्रदेश कॉँग्रेसचे सचिव तौफिक मुल्लाणी, अहमद मुजावर, कामगार नेते शामराव कुलकर्णी, आदींची भाषणे झाली. यावेळी अशोकराव आरगे, अशोकराव सौंदत्तीकर, महावीर कुरूंदवाडे, आदी पदाधिकाऱ्यांसह आजी-माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज : नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली असून, शेतकरी, कामगार, महिला, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीयांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून, त्यांच्यावर विवेकशून्य निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे, अशा आशयाचे निवेदन गडहिंग्लज तालुका काँगे्रस समितीतर्फे येथील तहसीलदारांना देण्यात आले.
शिष्टमंडळात काँगे्रसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-गिजवणेकर, शहराध्यक्ष बसवराज आजरी, विद्याधर गुरबे, अजित बंदी, दयानंद पट्टणकुडी, रावसाहेब पाटील, तानाजी कुराडे, प्रशांत देसाई, इम्रान मुल्ला, राजशेखर यरटे, उदयकुमार देसाई, अरुण बेल्लद, सिद्धाप्पा कल्याणी, समावेश होता.
शिरोळ : नोटाबंदीच्या निषेधार्थ शुक्रवारी शिरोळ तालुका काँग्रेस आय पक्षाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार ए. वाय. दिवे यांना देण्यात आले. मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन पाठवू, असे आश्वासन नायब तहसीलदार दिवे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उल्हास पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव अर्चना संकपाळ, लोकसभा युवकचे सरचिटणीस किरण पाटील, रुपेश मोरे, रणजित जगदाळे, संतोष आवटी, उमेश काळे, शीतल मिसाळ, गोमटेश गतारे, संतोष चौगुले, रफीक जमादार, दीपक माने उपस्थित होते. मलकापूर : केंद्र शासनाने नागरिकांना बँकामार्फत पैसे उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा शाहूवाडी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन नायब तहसीलदार विजय जमादार यांना देण्यात आले.
निवेदनावर सभापती पंडितराव बलवडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाषराव इनामदार, माजी जि. प. सदस्या स्नेहा जाधव, माजी पं. स. सदस्य यशवंत सुतार, माजी उपसभापती विष्णू पाटील, सरपंच विष्णू यादव, लक्ष्मण पाटील, शामराव कांबळे, अमर खोत आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चंदगड : शासनाने त्वरित रोख चलनात वाढ करावी व एटीएममधील रकमेतही वाढ करावी, अशी मागणी राष्ट्रीय काँगे्रसतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार आप्पासाहेब समींदर यांना देण्यात आले आहे. निवेदनावर, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, सभापती ज्योती पाटील, उपसभापती शांताराम पाटील, जि. प. सदस्य राजेंद्र परीट, तात्यासाहेब देसाई, अनिल सुरूतकर, पं. स. सदस्य तुळसा तरवाळ, मारुती पट्टेवार, नामदेव पाटील, अनुराधा पाटील, निंगो गुरव, गजानन कुंभार, बंडू चिगरे, शिवाजी फडके, दयानंद पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हातकणंगले : नोटबंदीच्या निषेधार्थ शुक्रवारी हातकणंगले तालुका काँग्रेस (आय)च्यावतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्यावतीने नायब तहसीलदार अर्चना पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये राजू जयवंतराव आवळे यांच्यासह भगवान जाधव, भैरवनाथ पवार, रहमान मुलाणी, शकील आतार आदी उपस्थित होते.


फसलेला : निर्णय
दहशतवाद्यांना होत असलेल्या काळ्या पैशाचा पुरवठा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटा या तीन मुद्द्यांवर भाजप सरकारने नोटाबंदी केली; परंतु कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने त्याचा प्रचंड फटका सर्वसामान्यांना बसला आहे. हा निर्णय जाहीर केल्यापासून देशामध्ये आर्थिक अराजकता माजली असून हा निर्णय पूर्णपणे फसलेला आहे असे काँग्रेस पक्षाने म्हटले आहे.

Web Title: Opposition protesting against Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.