कुंभी कासारीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विरोधी शाहू आघाडीचे पँनेल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2023 08:34 PM2023-01-28T20:34:31+5:302023-01-28T20:35:01+5:30
विरोधी राजर्षी शाहू आघाडीचे जाहीर करण्यात आलेले गटवार उमेदवार वाचा
प्रकाश पाटील
कोल्हापूर - कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विरोधी शाहू आघाडीने आज पॅनेल जाहीर केले आहे. पाची गटात सत्ताधारी गटाला तगडे आव्हान देणारे उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे आज सर्व नेत्यांनी एकत्र बसून सर्वसमावेशक एकच पॅनल सत्ताधारी गटाच्या विरोधात दिले असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे.
विरोधी राजर्षी शाहू आघाडीचे जाहीर करण्यात आलेले गटवार उमेदवार पुढील प्रमाणे
गट नंबर १-एकनाथ चित्राप्पा पाटील(कुडित्रे), युवराज कृष्णा पाटील,शिवाजी पांडुरंग तोडकर तोडकर(वाकरे)
गट नंबर २- बाजीराव नानासो खाडे(सांगरूळ), राजेंद्र गुंडाप्पा सुर्यवंशी(बीड), सरदार शिवाजी पाटील (शिरोली दु)बुध्दीराज शंकर पाटील(महे),
गट नंबर ३- आनंदा कृष्णा पाटील (खुपीरे),सर्जेराव जोती पाटील(खुपीरे), बाजीराव दौलु पाटील(कोगे),
गट नंबर ४- शशिकांत आडनाई(यवलूज), स्नेहदीप बाजीराव पाटील (क। ठाणे),सरदार बाडे (पुनाळ)
गट नंबर ५-प्रकाश पांडुरंग देसाई(देसाईवाडी),नानासो चिमाजी पाटील(पाटपन्हाळा),विलास बोगरे(सुळे), आनंदा चौगले(हरपवडे)
इतर मागास प्रतिनिधी -विकास पाटील (कोलोली)
महिला प्रतिनिधी-राजश्री सुभाष पाटील(वाकरे),स्नेहल उत्तम पाटील (शिंगणापूर)
भटक्या विमुक्त जाती जमाती - बाबूराव भाऊसो रानगे(सावरवाडी)
अनुसूचित जाती जमाती - हिंदुराव श्रावणा कांबळे(हिरवडे दु।)