‘बिद्री’साठी विरोधकांच्या वल्गना
By admin | Published: April 11, 2016 12:28 AM2016-04-11T00:28:57+5:302016-04-11T00:33:34+5:30
ए. वाय. पाटील : बिद्री कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
सोळांकूर : गेल्या दहा वर्षांत के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासद व संस्था हित साधण्याचे अनेक चांगले निर्णय घेतले. केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी विरोधक मंडळी ‘बिद्री’वर चुकीचे आरोप करत आहेत. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना इथल्या स्वाभिमानी सभासद बळी पडणार नाही. कोणी कितीही वल्गना केल्या तरी ‘बिद्री’वर राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता येणार, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.
सोळांकूर (ता. राधानगरी) येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नामदेवराव भोईटे होते.
पाटील म्हणाले, सहवीज प्रकल्पामुळे कारखान्याची आर्थिक उन्नती साधली आहे. मात्र, विरोधक केवळ सत्तेच्या हव्यासापोटी लोकांमध्ये गैरसमज पसरवित आहेत. संचालक मंडळाची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्ती झाली आहे.
प्रास्ताविक भिकाजी एकल यांनी केले. यावेळी नामदेवराव भोईटे, किसनराव चौगले, रामराव इंगळे, बाजीराव भांदिगरे, बाळाासहेब खैरे, यांची भाषणे झाली. मेळाव्यास राजेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष किसनराव चौगले, फिरोजखान पाटील, अशोक फराकटे, अमर पाटील, दिनकर पाटील, आर. वाय. पाटील, डी. जी. पाटील, फत्तेसिंग पाटील, युवराज वारके, विष्णुपंत शेळके, वि. दा. बरगे, के. डी. चौगले, मुन्ना पाटील, राजाराम पाटील, एकनाथ पाटील, संपतराव जाधव आदी उपस्थित होते.