शासनाचे उत्तम काम खुपत असल्याने विरोधकांचा बदनामीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:25 AM2021-08-15T04:25:06+5:302021-08-15T04:25:06+5:30

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे उत्तम काम सुरू आहे, ते खुपत असल्याने प्रसिद्धीसाठी विरोधी पक्षाकडून शासनाच्या ...

Opposition's notoriety as the government's good work is consumed | शासनाचे उत्तम काम खुपत असल्याने विरोधकांचा बदनामीचा डाव

शासनाचे उत्तम काम खुपत असल्याने विरोधकांचा बदनामीचा डाव

Next

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे उत्तम काम सुरू आहे, ते खुपत असल्याने प्रसिद्धीसाठी विरोधी पक्षाकडून शासनाच्या बदनामीचा डाव आखला जात आहे, असा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला. जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांचा योग्य पाठपुरावा व्हावा याकरिता त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली.

महानगरपालिकेस नगरोत्थानमधून मंजूर होणाऱ्या १७८ कोटींच्या निधीचा आराखडा तयार करावा. यंदाच्या महापुरात बाधित अपार्टमेंटमधील वरच्या मजल्यावरील रहिवासी नागरिकांनाही शासनाने मदत जाहीर केली असून, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवावी. शहराच्या हद्दवाढीच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. आयटी क्षेत्रात कोल्हापूरला नवी संधी असून, जिल्ह्यात आयटी पार्कसारखी संकल्पना राबविण्याचा आराखडा तयार करावा. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा शासनाकडून मंजूर झाला असून, त्याच्या निधीकरिता पाठपुरावा करावा, आदी विषयांच्या बाबतीतही चर्चा केली.

क्षीरसागर म्हणाले, सत्तेत असताना ज्यांना डॉक्टर, नर्सेस, व्यापाऱ्यांचे प्रश्न कळले नाहीत, राज्यातील दोन नंबरचे प्रमुख मंत्री कोल्हापुरात असतानाही कोल्हापूरचा विकास खुंटला, कोणतीही योजना आखता आली नाही, असे असताना आरोग्य परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भात आंदोलनाचा फायदा घेऊन विरोधी पक्षाकडून शासनाच्या बदनामीचा कुटिल डाव आखला आहे. आरोग्य परिचारिकांच्यातील नाराजी दूर करण्यास शासन सक्षम आहे, प्रसिद्धी माध्यमांकरवी माहिती नागरिकांना मिळत असल्याने त्यांचा सन्मान ठेवावा, प्रसिद्धी माध्यमे आणि अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधावा, असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी केले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले उपस्थित होते.

फोटो नं. १४०८२०२१-कोल-कलेक्टर मीटिंग

ओळ : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी चर्चा केली.

140821\14kol_1_14082021_5.jpg

ओळ : कोल्हापुर जिल्ह्यातील प्रलंबीत विकास कामांच्या पाठपुराव्यासाठी व्हावा याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Opposition's notoriety as the government's good work is consumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.