पर्यायी शिवाजी पुलाची फाईल पुढे सरकेना!

By admin | Published: April 25, 2017 12:10 AM2017-04-25T00:10:12+5:302017-04-25T00:10:12+5:30

मंत्रिमंडळाची प्रतीक्षा : दोन महिने बैठकच नाही; पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरही विलंब

Optional Shivaji bridge file to move forward! | पर्यायी शिवाजी पुलाची फाईल पुढे सरकेना!

पर्यायी शिवाजी पुलाची फाईल पुढे सरकेना!

Next

कोल्हापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाची फाईल अद्याप आश्वासनांच्या गर्तेतच सापडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडूनही थेट हस्तक्षेप होऊनही गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली नसल्याने या कामाच्या फायलीवर अंतिम मोहर उमटवलेली नाही. खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी खास प्रयत्न करूनही या फायलीचा प्रवास कासवगतीनेच सुरू आहे.
अनेक महिन्यांपासून पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम रखडले आहे. पुरातत्व विभागाच्या नियमांचा खोडा आडवा आल्याने या पुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामाच्या फायलीचा (पान ६ वर)


संसदेचे अधिवेशन आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुकीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळाची गेले दोन महिने बैठकच झाली नसल्याने शिवाजी पुलाच्या बांधकामाच्या फायलीवर कोणताही निर्णय झालेला नाही. त्याबाबत मी पाठपुरावा करत आहे.
- धनंजय महाडिक, खासदार

पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला होता, त्यांना आवश्यक असणारी माहिती व कागदपत्रे पाठविली असून पुलाबाबत लवकरच निर्णय होईल.
- आर. के. बामणे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग


डिसेंबर २०१५ पासून पुलाचे काम बंद
फेब्रुवारी २०१७ : सर्वपक्षीय कृती समितीचे तीव्र आंदोलन
फेब्रुवारी २०१७ : केंद्रीय पुरातत्व खात्याने सुधारीत प्रस्ताव केंद्रासमोर मंजुरीसाठी ठेवला
मार्च २०१७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खासदार संभाजीराजे यांची पुलाबाबत सविस्तर चर्चा
एप्रिल २०१७ : केंद्रीय पुरातत्व खात्याचे मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्याशी खासदार महाडिक यांची दिल्लीत चर्चा

Web Title: Optional Shivaji bridge file to move forward!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.