दिवाळीनंतर तोंडाच्या कर्करोगासंबधी जागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:57 PM2017-10-05T17:57:28+5:302017-10-05T17:59:22+5:30

 कोल्हापूर : भारतामध्ये तोंडाद्वारे होणाºया कर्करोगाचे प्रसारण खुप वेगाने होत आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी इंडिको रेमेडीज, कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर मिडटाऊन तर्फे जनजागृती केली जाणार आहे.

Oral cancer awareness campaign after Diwali | दिवाळीनंतर तोंडाच्या कर्करोगासंबधी जागृती अभियान

दिवाळीनंतर तोंडाच्या कर्करोगासंबधी जागृती अभियान

Next
ठळक मुद्देकोल्हापूर कॅन्सर सेटंर, इंडीको रेमेडीज व रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर मिडटाऊनचे आयोजनकोल्हापूरातील सर्व शाळा व संस्थांमध्ये दिवाळीनंतर अभियान राबविले जाणार

 कोल्हापूर : भारतामध्ये तोंडाद्वारे होणाºया कर्करोगाचे प्रसारण खुप वेगाने होत आहे. या रोगाला आळा घालण्यासाठी इंडिको रेमेडीज, कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर मिडटाऊन तर्फे जनजागृती केली जाणार आहे.

हे अभियान देशात सर्वत्र राबविले जाणार आहे. त्याच्या एक भाग म्हणून दिवाळीनंतर जिल्ह्यातील सर्व शाळांसह सर्वत्र ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहीती कोल्हापूर कॅन्सरचे डॉ. सुरज पवार, डॉ. पराग वाटवे व इंडीको रेमेडीजचे समीर दैनी यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.


भारतामध्ये तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी कर्करोगाचे रुग्णाची सुमारे एक लाख रुग्णांची नव्याने भर पडत आहे. त्यापैकी सुमारे पन्नास हजार रुग्ण या रोगामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सुपारी व मद्य हे घटक कर्करोगास कारणीभूत ठरत आहेत. यावर आळा घातल्यास कर्करोगाचे प्रमाण आटोक्यात येऊ शकते. याकरीता वेळीच उपचार घेणे हितवाह ठरते.

विशेषत: तोंडामध्ये लवकर भरुन न येणारी छोटी जखम, छोटी गाठ ही रोगीची प्राथमिक लक्षणे आहेत. नि दान व वेळेत उपचार झाल्यास तो बरा ह ोऊ शकतो. ही बाब महत्वाची मानून इंडीको रेमेडीज या औषध कंपनीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून अभियानाची सुरुवात केली आहे.

यापुर्वी टाटा हॉस्पिटल येथे अभियान राबविण्यात आले. आता कोल्हापूरातील सर्व शाळा व संस्थांमध्ये दिवाळीनंतर हे अभियान राबविले जाणार आहे. यावेळी डॉ. योगेश अनाप, शशांक इंदप, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर मिडटाऊनचे अध्यक्ष अनिकेत तगारे, अनिकेत अष्टेकर, डॉ. सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: Oral cancer awareness campaign after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.