अप्रमाणित किटद्वारे कोरोना तपासणीच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:40 PM2020-07-06T17:40:25+5:302020-07-06T17:41:21+5:30
आयसीएमआरया संस्थेचे मान्यताप्राप्त केलेल्या किटऐवजी दुसऱ्याच किटद्वारे कोल्हापुरातील शासकीय प्रयोगशाळेत कोरोना तपासणी करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले.
कोल्हापूर : आयसीएमआरया संस्थेचे मान्यताप्राप्त केलेल्या किटऐवजी दुसऱ्याच किटद्वारे कोल्हापुरातील शासकीय प्रयोगशाळेत कोरोना तपासणी करण्यात आलेल्या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले.
मान्यताप्राप्त संस्थेद्वारे सुमारे सव्वा कोटी रुपयांचे किट खरेदी केले; पण त्याऐवजी दुसऱ्याच किटद्वारे कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेत कोरोनाची तपासणी करण्यात आल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी बुधवारी (दि. १) पत्रकार परिषदेत केला होता.
या अमान्यताप्राप्त किटद्वारे आतापर्यत सुमारे सात हजार रुग्णांच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी देसाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.