‘कोल्हापूर अर्बन’ संचालकांच्या प्रवास खर्चाच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:22 AM2021-01-02T04:22:02+5:302021-01-02T04:22:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन को. ऑप. बँकेचे सहा संचालकांनी प्रशिक्षणासाठी कुलुमनाली दौऱ्यावर गेले असता २ लाख ...

Order to inquire into the travel expenses of the director of ‘Kolhapur Urban’ | ‘कोल्हापूर अर्बन’ संचालकांच्या प्रवास खर्चाच्या चौकशीचे आदेश

‘कोल्हापूर अर्बन’ संचालकांच्या प्रवास खर्चाच्या चौकशीचे आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर अर्बन को. ऑप. बँकेचे सहा संचालकांनी प्रशिक्षणासाठी कुलुमनाली दौऱ्यावर गेले असता २ लाख ४६ हजार खर्च केला आहे. याबाबत चौकशी करून पंधरा दिवसांत सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिले आहेत.

धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्था नागूपर यांनी २०१७ मध्ये कुलुमनाली येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षणास बँकेचे संचालक शिरीष कणेरकर, जयसिंग माने, मधुसुदन सावंत, विश्वास काटकर, सुभाष भांबुरे, ॲड. यशवंतराव साळोखे गेले होते. प्रशिक्षणाचा कालावधी हा तीन दिवसांचा असताना ११ दिवस जाऊन २ लाख ४६ हजार ३७३ रुपये बँकेचे खर्च केले होते. हा मुद्दा लेखापरीक्षणात आल्याने लेखापरीक्षक के. जी. बी. ॲन्ड असोसिएट यांनी ठपका ठेवून वाढीव खर्च संबंधित संचालकांनी भरण्याची सूचना केली होती तरीही पैसे भरले नसल्याने बँकेचे सभासद उदय मिसाळ यांनी सहकार विभागाकडे तक्रार केल्यानंतर सहकार आयुक्तांनी सदरच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी कोल्हापूर शहरचे उपनिबंधकांना चौकशी अधिकारी नेमले आहे.

सुरेश चौगुले हेही दौऱ्यावर

बँकेच्या संचालकांना प्रशिक्षण असताना मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चौगुले हे संचालकांसमवेत दौऱ्यावर गेले होते. त्यांनाही जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी उदय मिसाळ यांनी सहकार विभागाकडे केली आहे.

Web Title: Order to inquire into the travel expenses of the director of ‘Kolhapur Urban’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.