एस.टी.च्या माध्यमातून मागवा कोकणातील आंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 07:23 PM2021-04-08T19:23:49+5:302021-04-08T19:25:29+5:30
Mango St Konkan Kolhapur- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) आणि मे. गुणिना कमर्शियन यांच्यामार्फत राज्यभरात एस.टी. पार्सल सेवा सुरू आहे. त्याचे कोल्हापुरातील प्रतिनिधी असलेल्या सनदी एजन्सीने एस.टी.च्या माध्यमातून थेट कोकणातील आंबा मागविण्याची सेवा गुरुवारपासून सुरू केली. कोल्हापूरसह एस.टी. सेवा असलेल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आदी विविध ठिकाणी आंबे पोहोच करण्याची सेवाही दिली जाणार आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) आणि मे. गुणिना कमर्शियन यांच्यामार्फत राज्यभरात एस.टी. पार्सल सेवा सुरू आहे. त्याचे कोल्हापुरातील प्रतिनिधी असलेल्या सनदी एजन्सीने एस.टी.च्या माध्यमातून थेट कोकणातीलआंबा मागविण्याची सेवा गुरुवारपासून सुरू केली.
कोल्हापूरसह एस.टी. सेवा असलेल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आदी विविध ठिकाणी आंबे पोहोच करण्याची सेवाही दिली जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, सिंधुदुर्ग, मालवण, देवगड, चिपळूण, रत्नागिरी, आदी परिसरातील आंबा उत्पादक, कोल्हापूर आणि राज्यातील प्रवासी, नागरिकांच्या सोयीसाठी ही सेवा सुरू करण्यात आली असल्याचे रहिम सनदी यांनी सांगितले. यावेळी एस.टी.चे स्थानकप्रमुख सुरेश शिंगाडे उपस्थित होते.