दांड्या मारणाऱ्या वनमजुरांना चाप-उपवनसंरक्षकांचे परिक्षेत्र वनअधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:19 AM2018-03-24T00:19:01+5:302018-03-24T00:19:01+5:30

देवाळे : वनमजुरांची दररोजची उपस्थिती असल्याबाबतचा दैनंदिन हजेरी पट (रजिस्टर) वनपाल व वनरक्षक यांनी भरून पूर्ण ठेवण्याबाबत निर्र्देश देण्यात यावेत,

Order for obsolete forests by arbitrators | दांड्या मारणाऱ्या वनमजुरांना चाप-उपवनसंरक्षकांचे परिक्षेत्र वनअधिकाऱ्यांना आदेश

दांड्या मारणाऱ्या वनमजुरांना चाप-उपवनसंरक्षकांचे परिक्षेत्र वनअधिकाऱ्यांना आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देदैनंदिन हजेरी पट भरा :

देवाळे : वनमजुरांची दररोजची उपस्थिती असल्याबाबतचा दैनंदिन हजेरी पट (रजिस्टर) वनपाल व वनरक्षक यांनी भरून पूर्ण ठेवण्याबाबत निर्र्देश देण्यात यावेत, असे आदेश कोल्हापूरचे उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल यांनी जिल्ह्यातील सर्व परिक्षेत्र वनअधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे कामावर दांड्या मारणाऱ्या वनमजुरांना चाप बसणार आहे.

याप्रकरणी रामचंद्र करले यांनी आपलं सरकार पोर्टलवर तक्रार करून दाद मागितली होती.
शासनाने वेळोवेळी वनमजुरांच्या कामांबाबत जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार वनमजूर यांच्याकडून वनसंरक्षण व संवर्धन तसेच वन्यजीव संरक्षणाची कामे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. काही वनमजूर अत्यंत प्रामाणिकपणे काम करून स्वत:ची जबाबदारी पार पाडतात.

मात्र, काहीजण आपल्या कामाच्या ठिकाणी सोयीनुसार जाऊन दांड्या मारताना दिसतात. हा गंभीर प्रकार माहीत असूनही वनरक्षक व वनपाल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तथापि, सरकारी पगार व भत्ते त्यांच्यावर खर्च करूनदेखील वनमजूराने दररोज केलेल्या कामांची दप्तरी नोंद तसेच हजेरी पटआजअखेर ठेवली जात नव्हती. त्यामुळे काही वनमजुरांना हम करेसो कायदा, या न्यायाने आपल्या कामाची पद्धत ठेवण्याची सवय लागलीहोती. कामावर गैरहजर असतानाही पगार खर्ची पडायचा. वनरक्षकांची मर्जी संभाळली असल्यानेगैरहजर असल्याचा रिपोर्टवरिष्ठ कार्यालयाकडे जात नव्हता.

याबाबत रामचंद्र करले यांनी आक्षेप घेत वनमजुरांचा हजेरी पट तसेच दैनंदिन डायरीची दप्तरी नोंद घ्यावी, तसेच कामचुकार वनमजुरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आपलं सरकार पोर्टलवर केली होती. त्यानुसार उपवन संरक्षकांनी तत्काळ आदेश काढून हजेरी पट ठेवण्याबरोबरच वनमजुरांनी केलेल्या कामाचे प्रमाणपत्र वनपाल व वनरक्षक यांच्याकडून प्राप्त करून घेऊनच कार्यरत असलेल्या मजुरांचे मासिक वेतन व भत्ते आदा करण्यात यावेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, अशा सूचना सर्व रेंजरना देण्यात आल्या आहेत.

आमच्यावर कारवाई कराल तर याद राखा
आमच्यावर कारवाई करण्याची हिम्मत दाखवाच, अधिकाऱ्यांचे सगळे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्याची दर्पोक्ती एका कर्मचाऱ्याकडून दिली जात असल्याने याची चर्चा वनखात्यामध्ये जोरात सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी कारवाईचा बडगा उगारणार का, हा खरा प्रश्न आहे. उपवन संरक्षकांनी हजेरी पट ठेवण्याचे आदेश दिल्याने कामचुकार वनमजुरांचे धाबे दणाणले असून, प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कामावर दांड्या मारणाऱ्या वनमजुरांची गोपनीय माहिती घेऊन चौकशीअंती त्यांच्यावर कडक कारवाई करू. याशिवाय त्यांना पाठीशी घालणाºया अधिकाऱ्यांची देखील गय केली जाणार नाही.
- प्रभूनाथ शुक्ल

Web Title: Order for obsolete forests by arbitrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.