वडगाव बाजार समितीला मतदार याद्या करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:55+5:302021-09-02T04:53:55+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू ...

Order to Wadgaon Bazar Samiti to make voter lists | वडगाव बाजार समितीला मतदार याद्या करण्याचे आदेश

वडगाव बाजार समितीला मतदार याद्या करण्याचे आदेश

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकारी निवडणूक प्राधिकरणाने समितीला संलग्न संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल-तोलाईदारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

पेठ वडगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने राज्य शासनाने अशासकीय मंडळाची नियुक्ती केली. राज्यातील इतर मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या संचालकांना मुदतवाढ दिली. मग कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावसह तीन समित्यांवरच अशासकीय मंडळ कसे? याबाबत समितीचे माजी सभापती सुरेश पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ३१ ऑक्टाेबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समितीला याद्या तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.

३१ जुलै २०२१ ‘कट ऑफ डेट’

बाजार समितीची मतदार यादी तयार करण्यासाठी प्राधीकरणाने ३१ जुलै २०२१ ही कट ऑफ डेट दिली आहे. त्यानुसार समिती प्रशासन याद्या तयार करून सहकार विभागाला सादर करणार आहेत. समितीकडून याद्या आल्यानंतर प्रारूप यादी तयार करून हरकती घेतल्या जाणार आहेत.

असे राहणार गट-

एकूण जागा - १९

विकास संस्था -१४

ग्रामपंचायत -२

व्यापारी -२

हमाल, तोलाईदार -१

Web Title: Order to Wadgaon Bazar Samiti to make voter lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.