दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षकांच्या यादी मागविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:12 PM2021-02-24T16:12:59+5:302021-02-24T16:15:27+5:30
ssc exam Kolhapur- पाचवी ते बारावीसह पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची महाविद्यालयांतील वर्ग ऑफलाईन पद्धतीने भरत आहेत. शिवाजी विद्यापीठाकडून मार्च-एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होणार आहे.
कोल्हापूर : पाचवी ते बारावीसह पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची महाविद्यालयांतील वर्ग ऑफलाईन पद्धतीने भरत आहेत. शिवाजी विद्यापीठाकडून मार्च-एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होणार आहे.
कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील १,२१,१५९ विद्यार्थ्यांनी बारावीसाठी, तर १,८४४५९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षांसाठी आतापर्यंत नोंदणी केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या परीक्षांसाठी पर्यवेक्षक, नियामकांच्या नावांच्या याद्यांची मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मागविल्या आहेत.
विभागामध्ये बारावीसाठी चार आणि दहावीसाठी दोन नव्या परीक्षा केंद्रांची मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत पाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव देवीदास कुलाल यांनी मंगळवारी दिली. कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर सत्रातील परीक्षांसाठी अर्ज भरण्याची मुदत शिवाजी विद्यापीठाने गुरुवार(दि. २५)पर्यंत वाढविली आहे.
या सत्रातील मार्च-एप्रिल दरम्यान ६२१ परीक्षा होणार आहेत. त्यात पहिल्या सत्राच्या परीक्षांची संख्या शंभर आहे. सुमारे दोन लाख विद्यार्थी या परीक्षांसाठी नोंदणी करतील. परीक्षांचे स्वरूप, त्या घेण्याची पद्धती आणि वेळापत्रक, आदींबाबत गुरूवारी होणाऱ्या विद्या परिषदेत निर्णय होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी दिली.