अमृत योजनेतील कामाला गती देण्याचे आदेश, रेल्वे व्यवस्थापकांनी केली कोल्हापूर स्थानकाची पाहणी

By संदीप आडनाईक | Published: December 21, 2023 06:55 PM2023-12-21T18:55:41+5:302023-12-21T18:55:51+5:30

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्जीवनाचे काम अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू

Ordered to speed up work in Amrit Yojana, railway managers inspected Kolhapur station | अमृत योजनेतील कामाला गती देण्याचे आदेश, रेल्वे व्यवस्थापकांनी केली कोल्हापूर स्थानकाची पाहणी

अमृत योजनेतील कामाला गती देण्याचे आदेश, रेल्वे व्यवस्थापकांनी केली कोल्हापूर स्थानकाची पाहणी

कोल्हापूर : पुणे विभागीय रेल्वे व्यवसस्थापक इंदूराणी दुबे यांनी कोल्हापूररेल्वे स्थानकाची सुमारे तासभर पाहणी करुन संबंधितांना सूचना दिल्या. अनेक विभागाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली तर सुरु असलेल्या कामाची गती वाढविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. 

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्जीवनाचे काम अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू आहे, मात्र या कामाला अद्याप गती मिळालेली नव्हते. पुण्यातील विभागीय बैठकीत रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी याविषयी तक्रार केली होती. त्यानंतर तातडीने त्यांनी या स्थानकाची पाहणी करण्याचा निर्णय त्यांनी घेत गुरुवारी सकाळी प्रथम सातारा आणि दुपारी साडे चार वाजता त्यांनी कोल्हापूरची पाहणी केली. 

त्यांच्यासोबत वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला, मुख्य बांधकाम व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, विभागीय अभियंता डॉ. विकास श्रीवास्तव, स्टेशन व्यवस्थापक आर. के. मेहता, मिलिंद वाघुर्लीकर, सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी उपस्थित होते.

Web Title: Ordered to speed up work in Amrit Yojana, railway managers inspected Kolhapur station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.