सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवलं, देशाच्या 'बजेट'वर राजू शेट्टींची तिखट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 04:03 PM2023-02-01T16:03:08+5:302023-02-01T16:35:33+5:30
निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत.
लोकसभा निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. त्यामध्ये मध्यमवर्गाला दिलासा मिळण्यासाठी करसवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली आहे. याशिवाय काही गोष्टी महाग झाल्यात, तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजप नेत्यांकडून या बजेटचं स्वागत करण्यात येत असून सर्वजनहिताय असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या बजेटवर आपण समधानी नसल्याचं म्हटलंय.
निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता प्रतिक्रिया येत आहेत. सत्ताधारी भाजसह मित्र पक्षांकडून या बजेटचं स्वागत केलं जात असून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनीही हा अर्थसंकल्प शेवटच्या व्यक्तीपर्यंतचा असल्याचे म्हटले आहे. मात्र, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने धोरण नसल्याची टीका केली.
या बजेटवर मी तरी समाधानी नाही. सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवले आहे. तर, रासायनिक खाताच्या वाढत्या किंमती नियंत्रणात कस आणणार या प्रश्नाचे उत्तर बजेटमध्ये नाही. डेअरी आणि पोल्ट्रीसाठी तोकडी तरतूद करण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलंय. तसेच, या देशातील केवळ 4% लोकांनाच हमीभाव मिळतो. शेतीसाठी सरकार करतंय काय? ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात तुमचं समाधान नाही झाल का? भरड धान्य शेतकऱ्याला परवडतं का?, असे अनेक सवाल शेट्टी यांनी विचारले आहेत.
ऊसाचा एफआरपीप्रमाणे हमीभाव कायदेशीर करा. ऊस वजन करणारे काटे डिजिटल करण्याची मागणी होतं नाही. तर, मग प्रत्यक्ष डिजिटलायझेशन होणार का?. कापूस उत्पादकसाठी नवनवीन बियाणे आणि संशोधन कारण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाहीत. किमान हमीभाव कायदा करावा तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असे मुद्दे मांडत राजू शेट्टींनी बजेटवर आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सुजय विखे पाटील
विरोधक बजेटबाबत चांगले बोलतील, याची अपेक्षाच नाही. मात्र, या अर्थसंकल्पात करसवलतीची वाढवलेली मर्याचा महत्त्वाची आहे. करसवलतीतून जे पैसे सामान्य जनतेचे वाचतील, ते पैसे गुंतवणुकीच्या माध्यमातून बाजारात येतील. या वेगळ्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास वाढवण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत, असे सुजय विखे-पाटील यांनी सांगितले