पाहुण्यांना मिळणार सेंद्रिय गूळ भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2016 11:54 PM2016-01-17T23:54:17+5:302016-01-18T00:42:55+5:30

आधुनिक गुऱ्हाळ घरे सज्ज : साताऱ्यातील उद्योजकाचा शेतीपूरक नवीन व्यवसाय

Organic gooseberries get gifts! | पाहुण्यांना मिळणार सेंद्रिय गूळ भेट!

पाहुण्यांना मिळणार सेंद्रिय गूळ भेट!

Next

गुऱ्हाळ घरांना घरघर लागलेली असतानाच साताऱ्यात पारंपरिक गुऱ्हाळ घराला संशोधनाची जोड देत आधुनिक गुऱ्हाळघर बनविले आहे. उद्योजक पांडुरंग शिंदे यांनी हे गुऱ्हाळघर निर्माण केले आहे. याच गुऱ्हाळ घरामधून ते सेंद्र्रिय पद्धतीच्या गुळाचे उत्पादन घेतात.पाहुण्यांसाठी म्हणून पुन्हा एकदा पाण्याच्या ताब्यांबरोबर गुळाचे खडे, काकवी शेंगदाणे आणि गूळ, खोबरं ही लोप पावलेला पाहुणचार पाहायला मिळेल. साताऱ्याच्या कंदी पेढ्याच्या गोडव्या इतकाच मनाला गोडवा देणारा आणि माणसं जोडणारा पाहुणचार असेल, यात शंका नाही.
गूळ म्हटलं की, कोल्हापूर आठवते. गूळ संशोधन केंद्र गुळाची बाजारपेठ आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतपत गुऱ्हाळ घरे कोल्हापुरात शिल्लक आहेत. एक भलीमोठी लोखंडी काहील तिच्यामध्ये, उसाचा रस विशिष्ट तापमानाला उकळविला जातो आणि त्यानंतर तो थंड करण्यासाठी जवळच असणाऱ्या काहिलीसारख्याच जमिनीत असणाऱ्या खोलगट भागात थंड करण्यासाठी... ‘बोला... पुंडलिक वर दे हरी विठ्ठल’ अशा जयघोषात ही काहील ओतली जाते.
या पारंपरिक पद्धतीला आधुनिक संशोधन आणि यंत्राची जोड देत उद्योजक पांडुरंग शिंदे यांनी साताऱ्यापासून आठ किलो मीटरवर असणाऱ्या पाटखळ येथे गुऱ्हाळघरची निर्मिती केली आहे. सर्वप्रथम सेंद्रिय पद्धतीने वाढलेला ऊस या गुऱ्हाळ घरातील चरकामध्ये घातला जातो. या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारा रस हा काढून टाकीमध्ये साठविला जातो. या टाकीमधून विद्युत मोटारीच्या साह्याने चार चौकोनी काहिलींपैकी पहिल्या काहिलीत आणला जातो. या ठिकाणी पूर्व तापमानावर गरम केला जातो.
त्यानंतर पुढील काहिलीमध्ये तो रस तापविण्यासाठी सोडला जातो. या ठिकाणी विशिष्ट तापमानाला उकळविला जातो. तसेच भेंडीचे खोड पाण्यामध्ये मिश्रण करून हे मिश्रण या काहिलीत टाकले जाते. येथे दर्जेदार रसातून मळी बाजूला केली जाते व पुन्हा हा रस पुढील काहिलीमध्ये सोडला जातो. या ठिकाणी पुन्हा भेंडीचे मिश्रण टाकले जाते आणि अंतिम काहिलीमध्ये उकळविण्यासाठी रस सोडला जातो.
विशिष्ट तापमानाला रस तापविल्यानंतर त्याची काकवीत रूपांतर होते. ही सेंद्रिय काकवीही बंद बाटलीतून विक्रीला रवाना होते. उर्वरित रस थंड करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या चौकोनी पात्रात सोडला जातो.
या ठिकाणी रस थंड झाल्यानंतर गुळाचे रवे बनविण्यासाठी तो एक किलोच्या साच्यामध्ये ओतला जातो. अशाप्रकारे सेंद्रिय पद्धतीचा दर्जेदार गूळ विक्रीसाठी सज्ज होतो.

प्रशांत सातपुते

चिपाडाचा इंधन म्हणून वापर
४यांत्रिक मोटारवर चालणाऱ्या या गुऱ्हाळ घरात उसाचा जास्तीत जास्त रस काढला जातो. शिवाय रस निघालेल्या उसाच्या चिपाडाचा वापर याच रसाला उकळविण्यासाठी या गुऱ्हाळ घरात इंधन म्हणून उपयोगात आणला जातो.

आरोग्याच्या दृष्टीने सर्वच सेंद्रिय उत्पादनाला चांगला भाव मिळत आहे. मॉल संस्कृतीत अशा सेंद्रिय उत्पादनावर विशेष भर दिला जात आहे. सेंद्रिय ऊस जर दिला तर कारखान्यांचा ऊसदर देणे शक्य आहे.
- पांडुरंग शिंदे, उद्योजक

Web Title: Organic gooseberries get gifts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.