सभासदांच्या पाठबळावर संस्था प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:53+5:302021-01-02T04:21:53+5:30

जयसिंगपूर : गेल्या तीन ते चार वर्षांत मंदीसदृश परिस्थिती, गतवर्षीचा महापूर त्यानंतर कोरोना अशी अनेकविध संकटे असतानाही कर्मवीर मल्टिस्टेट ...

The organization is in progress with the support of the members | सभासदांच्या पाठबळावर संस्था प्रगतिपथावर

सभासदांच्या पाठबळावर संस्था प्रगतिपथावर

Next

जयसिंगपूर : गेल्या तीन ते चार वर्षांत मंदीसदृश परिस्थिती, गतवर्षीचा महापूर त्यानंतर कोरोना अशी अनेकविध संकटे असतानाही कर्मवीर मल्टिस्टेट संस्था प्रगतिपथावर आहे. सभासद व ग्राहकांच्या पाठबळावर ठेवीमध्ये ३९ कोटीची वाढ होऊन ४५० कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेला अहवाल सालामध्ये चार कोटी दोन लाखांचा नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे माजी अध्यक्ष भाऊसो पाटील यांनी दिली.

येथील कै. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेची ३३ वी वार्षिक सभा पार पडली. अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते. उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी स्वागत केले, तर व्यवस्थापक दादासो किणिंगे यांनी नोटीस वाचन केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल भोकरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा विषद केला.

याप्रसंगी भूपाल गिरमल, आदिनाथ किणिंगे, प्रा. डी. ए. पाटील, कुमार पाटील, वि. दा. आवटी, अनिल भोकरे, भरत गाट, रावसो पाटील, सागर चौगुले, अरविंद मजलेकर, भाऊसो सूर्यवंशी, बाबासो हुपरे, रमेश पाटील, राजेंद्र नांदणे, बाबासो हुपरे, व्ही. के. बस्तवाडे, पुरंदर मगदूम, पार्श्वनाथ पाटील यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते. अमोल पाटील यांनी आभार मानले.

चौकट - संस्थेची सामाजिक बांधीलकी

एचडीएफसी विमा, वीराचार्य आधार, सुकन्या सन्मान, ज्येष्ठाधार, अंत्योदय योजनांमधून सभासदांना दहा लाखांची मदत, तर सामाजिक संस्था, अंध अपंग व्यक्तींना तसेच गंभीर आजारपणासाठी व महापूरसारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी बारा लाखांची मदत संस्थेकडून करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

फोटो - ०१०१२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टिस्टेटच्या वार्षिक सभेत भाऊसो पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The organization is in progress with the support of the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.