पॅरालिंपिक स्पोर्टस असोसिएशनचे आयोजन,  ७० हून अधिक दिव्यांग खेळाडू सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 06:50 PM2020-03-07T18:50:55+5:302020-03-07T18:52:38+5:30

दुसऱ्या जिल्हास्तरीय पॅरालिंपीक स्पर्धेसाठी व गोंदीया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेसाठी शनिवारी पॅरालिंपीक स्पोर्टस असोसिएशनतर्फे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. यात ७० हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला.

Organized by the Paralympic Sports Association, more than 3 disabled athletes participated | पॅरालिंपिक स्पोर्टस असोसिएशनचे आयोजन,  ७० हून अधिक दिव्यांग खेळाडू सहभागी

कोल्हापूरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात शनिवारी जिल्हास्तरीय पॅरालिंपिक स्पर्धा व गोंदीया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. यात दिव्यांग महिला स्पर्धकांची उपस्थिती लक्षणीय होती.

Next
ठळक मुद्देपॅरालिंपिक स्पोर्टस असोसिएशनचे आयोजन ७० हून अधिक दिव्यांग खेळाडू सहभागी

कोल्हापूर : दुसऱ्या जिल्हास्तरीय पॅरालिंपीक स्पर्धेसाठी व गोंदीया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेसाठी शनिवारी पॅरालिंपीक स्पोर्टस असोसिएशनतर्फे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. यात ७० हून अधिक दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला.

या निवड चाचणीचे उदघाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी महिलादिनाचे औचित्य साधून दिव्यांग महिला खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी
स्पधेर्चे उदघाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते झाले.

महिलादिनानिमीत्त (८ मार्च) आयुक्त यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी दिव्यांग अपंग खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला. महापालिकेतर्फे दिव्यांग स्पर्धांसह स्वतंत्र जीमची व्यवस्था करण्याची ग्वाही डॉ. कलशेट्टी यांनी दिली.

निवड चाचणीत धावणे, गोळाफेक, थाळी फेक, भाला फेक, लांब उडी आदी मैदानी खेळ प्रकार घेण्यात आले. स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने केले. ही निवड चाचणी प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे,अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास चौगुले,सचिव विनायक सुतार, सुरेश ढेरे, उमेश चटके, प्रशांत म्हेत्तर, वैजनाथ केसरकर, विष्णूपंत पाटील, अजित कदम, उज्वला चव्हाण, जानकी मोकाशी यांच्यासह खेळाडू , पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Organized by the Paralympic Sports Association, more than 3 disabled athletes participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.