जैवविविधतेच्या अभ्यासासाठी चित्री परिक्रमेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:49+5:302021-02-06T04:44:49+5:30

आजरा तालुक्यातील चित्री धरण परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी चित्री परिक्रमा या उपक्रमाचे आयोजन केले आहे. पाणी फाउंडेशन व सह्याद्री ...

Organizing Chitri Parikrama for the study of biodiversity | जैवविविधतेच्या अभ्यासासाठी चित्री परिक्रमेचे आयोजन

जैवविविधतेच्या अभ्यासासाठी चित्री परिक्रमेचे आयोजन

Next

आजरा तालुक्यातील चित्री धरण परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी चित्री परिक्रमा या उपक्रमाचे आयोजन केले आहे. पाणी फाउंडेशन व सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर्स गडहिंग्लजच्या माध्यमातून युवक १४ फेब्रुवारीपासून माहिती गोळा करणार असल्याची माहिती आजरा कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे व सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर्सचे अध्यक्ष प्रा. अनिल मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आजरा तालुक्यातील रामतीर्थ, चित्रीसह विविध ठिकाणे पर्यटनस्थळे झाली आहेत. मात्र, ही ठिकाणे प्रदूषित करण्याचे काम काही जणांकडून सुरू आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. चित्री परिक्रमेतून लोकांमध्ये जागरूकता करणे, औषधी वनस्पती, पक्षी, कीटक यांचा अभ्यास केला जाणार आहे. आपल्या आरोग्यसोबत निसर्गही चांगला राहावा हा यामागील हेतू आहे, असे शिंत्रे यांनी सांगितले.

चित्री परिक्रमामध्ये प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांची पाहणी व नोंदणी, दगड व मातीची शुद्धता तपासणे यासाठी दररोज सकाळी ८ वाजता परिक्रमेला सुरुवात होणार आहे. परिक्रमा २७ कि.मी.ची असून यामध्ये तरुणांचा सहभाग असणार आहे. चित्री प्रकल्प परिसरातील स्वच्छताही केली जाणार आहे, असे प्रा. अनिल मगर यांनी सांगितले.

यावेळी अनंत पाटील, युवराज पोवार, महेश पाटील, ओंकार माद्याळकर, अमोल देसाई, गिरीश मेवेकरी, किसन धबाले, आदेश विचारे, उमेश डेळेकर उपस्थित होते.

---------------------------

* चित्री परिक्रमेत २७ कि.मी.चा प्रवास

परिक्रमेत प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कीटक, सरपटणारे प्राणी, माशांचे प्रकार माती व दगडांचे नमुने, औषधी वनस्पती, पावसाचे प्रमाण याची माहिती व अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये अग्रक्रमानुसार १०० युवकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे व एकूण परिक्रमा २७ कि.मी.चा आहे.

Web Title: Organizing Chitri Parikrama for the study of biodiversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.