विश्वपंढरीमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:25 AM2021-02-10T04:25:00+5:302021-02-10T04:25:00+5:30
विश्वनाथ महाराज यांचा १०२ वा पुण्यस्मरण सोहळा या कालावधीत संपन्न होत असून शासननिर्देशानुसार साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ...
विश्वनाथ महाराज यांचा १०२ वा पुण्यस्मरण सोहळा या कालावधीत संपन्न होत असून शासननिर्देशानुसार साध्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात येत आहेत. सोमवारी सकाळी गुरूबाबा औसेकर यांच्या हस्ते पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी विवेक घळसासी यांचे प्रवचन तर रात्री नातेपुते येथील सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन झाले. याच दिवशी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते मोदामृत या औषधीयुक्त टॉनिकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आनंदनाथ सांगवडेकर, चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजन सांगवडेकर उपस्थित होते. या आरोग्य शिबिरामध्ये विविध रोगांवर उपचार वा चिकित्सा केली जाणार आहे. विश्वपंढरीच्या अधिकृत पेजवर हे सर्व कार्यक्रम लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत.
०९०२२०२१ कोल विश्वपंढरी
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते सोमवारी विश्वपंढरी येथे मोदामृत या औषधीयुक्त टॉनिकचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गुरूबाबा औसेकर, आनंदनाथ सांगवडेकर, चिकित्सालयाचे अध्यक्ष निरंजन सांगवडेकर उपस्थित होते.