मलतवाडी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:29 AM2021-02-17T04:29:13+5:302021-02-17T04:29:13+5:30

चंदगड : मलतवाडी (ता. चंदगड) येथील स्वराज्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त शुक्रवार (१९) सायंकाळी सहा वाजता ...

Organizing Malatwadi oratory competition | मलतवाडी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मलतवाडी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Next

चंदगड : मलतवाडी (ता. चंदगड) येथील स्वराज्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त शुक्रवार (१९) सायंकाळी सहा वाजता मायाप्पा मंदिरात खुल्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. 'जाणता राजा शिवछत्रपती', 'स्वराज्य रक्षक संभाजी महाराज' असे या वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत. ही स्पर्धा जिल्हास्तरीय (खुला गट) व गाव मर्यादित गटात होणार आहे. जिल्हास्तरासाठी २००१, १५०१, १००१, तर गाव गटासाठी ५०१, ४०१, ३०१ अशी बक्षिसे आहेत.

-----------------------

२) गडहिंग्लजमध्ये शनिवारी वूध-वर मेळावा

गडहिंग्लज : लिंगायत समाज वधू-वर व सर्व पोटजातींचा वधू-वर मेळावा शनिवार (२०) सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत शहरातील जडेयसिद्धेश्वर आश्रम बेलबागेमध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अरुण बेल्लद यांनी दिली.

-----------------------

३) छायावृत्त केवळ नशीब बलवत्तर म्हणून..! मुमेवाडी-उत्तूर (ता. आजरा) मार्गावर मसाल्याचे साहित्य घेऊन गोव्याकडे जाणारा (एमएच ०९ बी.सी. १३४६) हा टेम्पो स्मशान शेडजवळ आला असताना गतिरोधकाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटल्याने उजव्या बाजूस असणाऱ्या लिंबाच्या झाडावर आदळला. चालक व वाहक यांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. मसाल्याचे साहित्य सर्वत्र विखुरले; मात्र जीवितहानी टळली. हा अपघात सकाळी नऊ वाजता घडला.

(रवींद्र येसादे) क्रमांक : १६०२२०२१-गड-०१

Web Title: Organizing Malatwadi oratory competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.