लघुपटांच्या अमृतमहोत्सवाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:00+5:302021-07-10T04:18:00+5:30
कोल्हापूर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालयामार्फत राष्ट्रीय ...
कोल्हापूर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालयामार्फत राष्ट्रीय स्तरावर ‘लघुपटांचा अमृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
हागणदारीमुक्ती आणि घनकचरा व्यवस्थापनावर आधारित ही स्पर्धा होणार आहे. जैव- विघटनशील (Boi- degradable) कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल या
प्रत्येक विषयाकरिता तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी अनुक्रम १ लाख ६० हजार, ६० हजार, ३० हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन संबंधित लघुपटात स्वच्छता संदेश किंवा तांत्रिक उपाय पुढील पाच भौगोलिक क्षेत्रांशी संबंधित असावेत. वाळवंट क्षेत्र,डोंगराळ प्रदेश,सागरी किनारपट्टी लगतचा प्रदेश,मैदानी भाग,पूरप्रवण क्षेत्र
या प्रत्येक विषयाकरिता तीन पुरस्कार असून यासाठी दोन लाख, एक लाख वीस हजार आणि ८० हजार रुपये अशी बक्षिसे आहेत.
स्पर्धकाने ई मेल आयडीसह हा लघुपट You Tube वर अपलोड करावा. अपलोड केलेली लिंक स्पर्धकाने https://www.mygov.in/ या संकेतस्थळावर स्पर्धेच्या अर्जासह २० जुलै २१ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.