भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वेबिनारचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:40+5:302021-03-28T04:22:40+5:30
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर येथे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ आयसी एच क्वालिटी गाईडलाईनस या विषयावर अनघा महाराव ...
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर येथे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ आयसी एच क्वालिटी गाईडलाईनस या विषयावर अनघा महाराव ट्रेनर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्स डोंबिवली यांचे वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एन. मोरे म्हणाले की शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले विषयाचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी अशा वेबिनारमघे मध्ये सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. अनघा महाराव यांनी आपल्या व्याख्यानांमध्ये सांगितले की आयसीएच गाईड लायन्स या विषयाला औषधे कंपनीत रिसर्च डेव्हलपमेंट फॉर्मुलेशन मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच त्यांनी बी फार्मसी इन्फॉर्मशन कोर्स केल्यानंतर कंपनीमधील वेगळे असणाऱ्या संधी याविषयी त्यांनी सहभागी ना मार्गदर्शन केले. शेवटी त्यांनी शंकांचे निरसन केले या वेबिनारमध्ये सुमारे १०० हून अधिक शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली राऊत तर आभार प्रदर्शन आशा जाधव यांनी केली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोरे, एच. एन. मोरे डॉ. एम. एस. भाटिया, डॉ. अनिल कुमार शिंदे इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.