वाशीत बिरदेवाच्या मूर्तीची मूळरूपात प्रतिष्ठापणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:40+5:302021-03-13T04:42:40+5:30

: ‘ बिरोबाच्या नावानं चांगभलं’ धनगरी ढोलांचा गजर व भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत वाशी, ता. करवीर येथील लाखो भाविक ...

Originally installed the idol of Birdeva in Vashi | वाशीत बिरदेवाच्या मूर्तीची मूळरूपात प्रतिष्ठापणा

वाशीत बिरदेवाच्या मूर्तीची मूळरूपात प्रतिष्ठापणा

googlenewsNext

: ‘ बिरोबाच्या नावानं चांगभलं’ धनगरी ढोलांचा गजर व भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत वाशी, ता. करवीर येथील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरदेवाच्या मूळ स्वरूपातील मूर्तीची प्रतिष्ठापणा मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. येथील बिरदेव मूर्तीवर मागील वर्षी वज्रलेप करण्यात आला होता. मात्र, चुकीच्या पद्धतीने वज्रलेप झाल्याने वाद झाला. यामुळे देवस्थान समितीने तात्काळ मूर्ती बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नवीन मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. आंबील-घुगऱ्याचा नैवेद्य, पुरणपोळी, सुवासनींनी डोक्यावर गारव्याच्या दुरड्या व सजविलेल्या अंबिलाच्या घागरी घेऊन या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.

यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापणा करण्यात आली. त्यानंतर दर्शनासाठी मूर्ती खुली करण्यात आली.

फोटो : ११ वाशी बिरदेव

वाशी, ता. करवीर येथील बिरदेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.

Web Title: Originally installed the idol of Birdeva in Vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.