अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:57 AM2019-08-17T10:57:40+5:302019-08-17T11:02:12+5:30

सलग आठ दिवसाच्या पूरस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर आरोग्य विभागाने इतर पाच जिल्ह्यातील २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सहकार्यासाठी बोलावून घेतले आहे. आरोग्य सेवा संचालक अर्चना पाटील यांनीही कोल्हापुरात थांबून या सर्व परिस्थितीचा आढावा घेत योग्य त्या सुचना दिल्या आहेत.

Other District Medical Officers in Kolhapur District | अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात

अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यात

Next
ठळक मुद्देअन्य जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यातएकनाथ शिंदे यांनी लावली यंत्रणा, गावागावात प्रत्यक्ष काम सुरू

कोल्हापूर : सलग आठ दिवसाच्या पूरस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर आरोग्य विभागाने इतर पाच जिल्ह्यातील २९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यात सहकार्यासाठी बोलावून घेतले आहे. आरोग्य सेवा संचालक अर्चना पाटील यांनीही कोल्हापुरात थांबून या सर्व परिस्थितीचा आढावा घेत योग्य त्या सुचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील ३00 हून अधिक गावांना पुराचा फटका बसल्यानंतर आता साथीचे रोग पसरू नयेत यासाठीची महत्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर पडली आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठ दिवसांमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तळ ठोकून प्रसंगी इतर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कोल्हापूर जिल्ह्यात बोलावणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पाच जिल्ह्यातून २९ वैद्यकीय अधिकाºयांना कोल्हापूर जिल्ह्यात तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे.

या आढावा बैठकीला आरोग्य सेवा (हिवताप)चे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळचे उपसंचालक डॉ.नितीन बिलोलीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बी. सी. केम्पीपाटील, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ प्रकाश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाहयसंपर्क) डॉ हर्षला वेदक, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचया प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.फारूक देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद मोरे, साथ रोग तज्ञ डॉ. संतोष तावशी आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

प्रभावी साथ प्रतिबंधासाठी पूरग्रस्त शिरोळ, हातकणगंले, करवीर, कागल, राधानगरी, चंदगड, पन्हाळा या तालुक्यांसाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी योग्य समन्वय ठेवून आरोग्य सेवा द्यावी अशा सुचना करण्यात आल्या आहेत. पन्हाळा- डॉ उषादेवी कुंभार, राधानगरी- डॉ फारूक देसाई, शिरोळ- डॉ हर्षला वेदक, हांतकणंगले- डॉ पी आर पाटील, कागल- डॉ सुवर्णा पाटील, करवीर- डॉ फाळके, चंदगड- डॉ व्ही .ए मोरे असे नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. साथरोग प्रतिबंधासाठी गृहभेटी व्दारे सर्व्हेक्षण, पाणी शुध्दीकरण, उपचार, अत्यंत महत्वाचे आहेत. यासाठी पूरग्रस्त तालुक्यात आरोग्य सेवक व आशा यांची प्रतिनियुक्ती काढण्यात आली आहे.

पूरबाधीत क्षेत्रामध्ये आरोग्य विषयक सेवा देणेसाठी इतर जिल्हयातील वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फत पूरग्रस्त क्षेत्रातील प्राथमिक आरोगय केद्रांमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे. तसेच विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना जिल्हा शल्यचिकित्सक मार्फत ग्रामीण रुग्णालय येथे पूरग्रसतासाठी तज्ञ वै्द्यकीय सेवा उपलब्द करून देण्यात आली आहे.

तसेच पूरग्रस्त तालुक्यातील आर.बी.एस.के. पथक तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मागदर्शनाखाली वैद्यकीय सुविधा देणार आहेत. नगरपालिका क्षेत्रामध्ये इचलकरंजी, कुरुंदवाड, पेठवडगांव, गडहिंग्लज कागल या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत पूरग्रस्तांसाठी विशेष आरोगय शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुरेसा औषध साठा उपलब्ध करण्यात आला असून सनियंत्रणासाठी मंडळ स्तरावर मध्यवर्ती औषध भांडार ची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या मार्फत मागणी, खर्च, पुरवठा इ. सनियंत्रणाचे कामकाज औषध निर्माण अधिकारी पाहणार आहेत. पूरगस्त भागातील दैनंदिन अहवाल प्राप्त करुन घेणे, अहवाल पृथ:करण करणे,एकत्रिकरण, सादरीकरण, इ मेल करणे हे काम जिल्हा एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कक्षा मार्फत करण्यात येणार आहे.

अ.नं              इतर जिल्हयाचे नांव      संख्या           नेमणूक तालुका
१                                    लातूर              ४                   हांतकणगले
२                            अहमदनगर            ८                   शिरोळ
३                           उस्मानाबाद             ४                   शिरोळ
४                                  नाशिक             ९                   करवीर
५                                   सातारा            ४                   शिरोळ
 

 

Web Title: Other District Medical Officers in Kolhapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.