अन्यथा कुरूंदवाडमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:52+5:302021-04-07T04:25:52+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कुरुंदवाड शहरात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाणे व नगरपरिषद ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कुरुंदवाड शहरात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाणे व नगरपरिषद प्रशासन यांनी व्यापाऱ्यांसह जनतेला कोरोनाबाबत जनजागृती करत खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करावी लागेल अशा सूचना दिल्या
दरम्यान शहरात काल रात्री कोराेनाचे नवे दोन रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून बाकीच्या सेवा बंद करण्यासाठी पोलीस व नगरपरिषद कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.
येथील पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी प्रणाम शिंदे, नितीन कदम,अभिजीत कांबळे, रोहित ढाले,अविनाश गोरे, सौरभ कोठावळे आदीसह अग्निशामकचे कर्मचारी देखील जनजागृती मोहीम पथकात सहभागी झाले होते.