...अन्यथा बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:49 AM2018-01-19T03:49:14+5:302018-01-19T03:49:41+5:30
प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या लेखी परीक्षेपूर्वी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गुरुवारी कोल्हापुरात दिला.
कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या लेखी परीक्षेपूर्वी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गुरुवारी कोल्हापुरात दिला. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महासंघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी सरकारविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
हा मोर्चा टाउन हॉल, दसरा चौक, बिंदू चौक, महापालिका चौकमार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे आला. तेथे शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष पी. एन. औताडे, उपाध्यक्ष एन. डी. बिरनाळे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश देसाई, सहसचिव प्रा. एन. बी. चव्हाण यांनी केले.
सन २००३ ते २०११मधील शासनमान्य ९३५ वाढीव पदांपैकी दुसºया टप्प्यात मान्यता झालेल्या १७१ व तिसºया टप्प्यातील शिक्षकांच्या वेतनाच्या तरतुदीचा प्रश्नही सोडवावा. नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर लागलेल्या सर्व प्रकारच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सन २०११पासूनच्या नवीन वाढीव पदांना शासनाने मंजुरी द्यावी. कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र व्हावे.
धारणी (अमरावती) : येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी तालुकास्तरीय जि.प. प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात शिक्षकांच्या दोन गटांत फ्री-स्टाइल हाणामारी झाली. या प्रकरणी दोन शिक्षकांवर निलंबनाची, तर तिघांविरुद्ध पगारवाढ थांबविण्याची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली. धारणी तालुक्यातील चटवाबोड व खाºयाटेंभरू येथील जिल्हा परिषद शाळांच्या संघादरम्यान कबड्डीचा अंतिम सामना सुरू होता. पंचायत समिती सभापती रोहित पटेल व उपसभापती जगदीश हेकडे पंचांची कामगिरी बजावित होते. पंचांच्या एका निर्णयावर वाद निर्माण होऊन दोन्ही पक्षांतील शिक्षक आमने-सामने आले. वाद विकोपाला गेल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.